Zomato annual report: दिल्लीमधील अंकुर नावाच्या एका व्यक्तीने ‘झोमॅटो’वर वर्षभरामध्ये तब्बल ३ हजार ३३० वेळा ऑर्डर केल्याची माहिती समोर आली आहे. फूड डिलेव्हरी अॅप्लिकेशन असलेल्या ‘झोमॅटो’ने २०२२ चा वार्षिक अहवाल जारी केला असून त्यामध्ये अंकुरच्या या ‘झोमॅटो’ प्रेमाची दखल घेण्यात आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार ही व्यक्ती दिवसाला किमान नऊ वेळा फूड ऑर्डर करायची. या व्यक्तीला कंपनीने, ‘द नेशन्स बिगेस्ट फूडी’ म्हणजेच देशातील सर्वात खाद्यप्रेमी व्यक्ती असा अनोखा किताब दिला आहे. खाद्यपदार्थांबद्दल अंकुरला असलेल्या प्रेमासाठी हा किताब दिला जात असल्याचं ‘झोमॅटो’ने आपल्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे.

Boult launches smart home audio devices first soundbars Bassbox X Series in India only 4999 rupees new sound system
फक्त पाच हजारांत घरी आणा Boult चा साउंडबार; टीव्ही, कॉम्प्युटर, मोबाइललाही करता येईल कनेक्ट
Delhi High Court whatsapp hearing
व्हॉट्सॲप बंद होणार? केंद्र सरकारच्या मागणीचा विरोध, दिल्ली उच्च न्यायालयात काय घडलं?
JioCinema IPL Free
यापुढे IPL मोफत पाहता येणार? जिओ सिनेमाही आता नेटफ्लिक्स, प्राइमप्रमाणे सबस्क्रिप्शनच्या वाटेवर
WhatsApp without internet allowed to send photos and files on Other Users Similar to apps like ShareIt
विना इंटरनेट करा फोटो,व्हिडीओ शेअर; ‘या’ ॲपमध्ये मिळणार सोय

‘झोमॅटो’ने २०२२ मधील फूट ट्रेण्ड्ससंदर्भातील अहवाल प्रकाशित केला. यामध्ये पुन्हा एकदा भारतीयांनी सर्वाधिक वेळा मागवलेली डिश म्हणून बिर्याणीच पहिल्या स्थानी आहे. दर मिनिटाला ‘झोमॅटो’ युझर्सने १८६ बिर्याणी मागवल्याचं या अहवालात म्हटलं आहे. विशेष म्हणजे ‘झोमॅटो’चे प्रतिस्पर्धी असलेल्या ‘स्विगी’ने जारी केलेल्या अहवालामध्येही बिर्याणीलाच भारतीयांनी सर्वाधिक पसंती दिल्याचं पहायला मिळालं होतं. २०२२ मध्ये दर मिनिटाला ‘स्विगी’वरुन १३७ बिर्याणी ऑर्डर करण्यात आल्याचं या अहवालात म्हटलेलं.

‘झोमॅटो’वर दुसरी सर्वात लोकप्रिय डिश ही पिझ्झा ठरली आहे. यावर्षी दर मिनिटाला ‘झोमॅटो’वरुन १३९ भारतीयांनी पिझ्झा मागवल्याचं हा अहवाल सांगतो. मुंबईमधील एका ग्राहकाने प्रोमो कोड वापरुन एका वर्षभरात सर्वाधिक म्हणजेच २ लाख ४३ हजारांची बचत केल्याचा उल्लेखही अहवालात आहे. मुंबईप्रमाणेच पश्चिम बंगलामधील राईगंजमध्येही डिस्काऊंट कोड वापरणाऱ्यांची संख्या अधिक असून देशातील कोणत्याही शहरापेक्षा येईल ग्राहक अधिक डिस्काऊंट कोड वापरतात असं हा अहवाल सांगतो. येथील ९९.७ टक्के ऑर्डर या डिस्काऊंट कोडसहीत असतात.

‘स्विगी’च्या अहवालानुसार तंदुरी चिकन, बटर नान, व्हेज फ्राइड राईस, पनीर बटर मसाला, चिकन फ्राइड राईस, व्हेज बिर्याणीसारख्या गोष्टींनाही या वर्षी भरपूर मागणी होती.