Amazon इंडिया ही एक लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाईट आहे. यावरून खरेदीदार त्यांना आवश्यक असलेल्या वस्तू खरेदी करू शकतात. या वस्तू खरेदी करत असताना त्यांना अनेक प्रकारचे डिस्काउंट आणि आकर्षक ऑफर्स मिळत असतात. तसेच कंपनी ग्राहकांसाठी अनेक प्रकारचे सेल घेऊन येत असते. अ‍ॅमेझॉन इंडियाने आपल्या आगामी फेस्टिव्हल सेल म्हणजेच ग्रेट इंडियन फेस्टिव्हल २०२३ ८ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या सेलमधील काही डिल्सबाबत कंपनीने खुलासा केला आहे. आयफोन १३ च्या बेस व्हेरिएंट ४० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध असणार आहे. याप्रमाणेच मॅकबुक एअरच्या किंमतीत मोठी कपात झाली आहे. सध्या मॅकबुक एअर सध्या ६९,९९० रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

आयफोन १३ ला २०२१ मध्ये भारतात ७९,९०० रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लॉन्च करण्यात आले होते. मागील काही महिन्यांमध्ये स्मार्टफोन्सवर मोठी सूट मिळत आहे. तसेच ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल दरम्यान हे डिव्हाइस ४० हजारांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध असेल. आयफोन १५ लॉन्च झाल्यानंतर Apple ने आयफोन १३ ची किंमत कमी करून ५९,९०० रुपये इतकी केली आहे. याबाबतचे वृत्त Indian Express ने दिले आहे.

An increase in the price of tomatoes Retail at Rs 80 per kg
टोमॅटोच्या दरात वाढ; किरकोळीत प्रतिकिलो ८०रुपयांवर
Prime Minister Modi changes his profile picture on social media
Photo: नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर नव्या लूकमध्ये; सोशल मीडिया प्रोफाइलमध्ये केला ‘हा’ मोठा बदल
elon musk apple reuters
“…तर आम्ही iphone सह Apple च्या सर्व उत्पादनांवर बंदी घालू”, एलॉन मस्क यांची धमकी
Property dispute of 300 crores daughter-in-law plan father-in-laws murder
३०० कोटींच्या मालमत्तेच्या वाद, सुनेनेच दिली सासऱ्याच्या खुनाची सुपारी
fraud of 1.5 crore with director by lure of double profit
मुंबई : दुप्पट फायद्याच्या नावाखाली दिग्दर्शकाची दीड कोटींची फसवणूक
CIDCO starts removing illegal billboards
उरण : सिडकोकडून बेकायदा फलक हटविण्यास सुरुवात
23 cm tumor removed from the adrenal gland Limca Book of Records
पुण्यातील डॉक्टरांनी अधिवृक्क ग्रंथीतून काढली २३ सेंटिमीटरची गाठ! लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद
Paytm loss at five and a half billion
पेटीएमचा तोटा साडेपाच अब्जांवर; रिझर्व्ह बँक निर्बंधांचा पुढच्या तिमाहीतही फटका बसण्याचे संकेत

हेही वाचा : Amazon Great Indian Festival Sale: १० ऑक्टोबरपासून सुरू होणार सेल; ‘या’ प्रॉडक्ट्सवर मिळणार आकर्षक ऑफर्स, VIDEO पाहाच

(Image Credit-Amazon)

आयफोन १३ ज्यांना ४० हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करायचा आहे त्यांना SBI बॅंकचे कार्ड वापरण्याची आवश्यकता आहे. तसेच ३९,९९९ रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्यासाठी तुम्हाला तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करावा लागणार आहे. याप्रमाणेच MacBook Air M1(review) सध्या Amazon वर केवळ ६९,९९० रुप्यांकमध्ये उपलब्ध आहे. हा सर्वात परवडणारा Apple मॅकबुक समजला जातो. जो कोणीही भारतात खरेदी करू शकतो. यामध्ये ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज मिळते. हे प्रॉडक्ट ९२,९०० रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आले होते.