Twitter New Logo Dogecoin : ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी ट्विटरचा लोगो बदलला आहे. आता प्रसिद्ध निळ्या चिमणीऐवजी श्वानाचा लोगो ट्विटरसाठी वापरण्यात आला आहे. हा बदल पाहून वापरकर्ते हैराण झालेले पाहायला मिळत आहेत. यावर ट्विटरवर जोरदार प्रतिक्रिया येत आहेत.

ट्विटरच्या लोगोत बदल झाल्यानंतर अनेकांना आधी ट्विटर हॅक झाले की काय असं वाटलं. मात्र, नंतर स्वतः एलॉन मस्क यांनीच ट्विट करत माहिती दिल्याने हा संभ्रम संपला आणि ट्विटरचा लोगो बदलण्यात आल्यावर शिक्कामोर्तब झालं.

Abhijeet Sawant
सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’ गाण्यावर अभिजीत सावंतने काढले भन्नाट सेल्फी! नेटकरी म्हणाले, “बाईSSS…”
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Bigg Boss 18 Why did Gunaratna Sadavarte decide to enter salman Khan show
Bigg Boss 18: गुणरत्न सदावर्तेंचा ‘बिग बॉस १८’मध्ये जाण्यामागचा होता ‘हा’ हेतू; म्हणाले, “कलाकारांची राजकीय लफडी…”
Bigg Boss 18 karan veer Mehra refuses to sacrifice his belongings for ration
Bigg Boss 18: “अविनाशच्या अहंकारासाठी मी…”, रेशनसाठी करणवीर मेहराने घेतली ठाम भूमिका; नेटकरी कौतुक करत म्हणाले…
Kajol
“तितकाच तिरस्कार…”, सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगवर काजोलची प्रतिक्रिया; म्हणाली, “आम्हाला या सगळ्याला…”
How to Hide Instagram likes
झाकली मूठ..! फॉलोअर्सपासून इन्स्टाग्राम पोस्टच्या लाइक कशा लपवायच्या?
Bigg Boss 18 Manu Punjabi's post went viral after Gunaratna Sadavarte left the Salman Khan Show
Bigg Boss 18: “तुमची आठवण येतेय, परत या…”, गुणरत्न सदावर्ते ‘बिग बॉस’च्या घराबाहेर गेल्यानंतर अभिनेत्याची पोस्ट; म्हणाला…
Bigg Boss 18 Avinash Mishra is not EVICTED from the salman khan show
Bigg Boss 18 : अविनाश मिश्रा घराबाहेर नाही तर गेला जेलमध्ये? दिला मोठा अधिकार

या निर्णयानंतर एलॉन मस्क यांनी एक मीम शेअर केलं. यात श्वान कारच्या चालकाच्या जागेवर बसलेलं आहे आणि ते वाहतूक पोलिसांना आपलं ओळखपत्र दाखवत आहे. या ओळखपत्रात निळ्या चिमणीचा फोटो आहे. त्यावर हे श्वान वाहतूक पोलिसांना हा आपला जुना फोटो असल्याचं सांगत आहे.

नेमका काय बदल?

हेही वाचा : ट्विटरमध्ये १५ एप्रिलपासून मोठे बदल; फक्त ब्लू टिक असलेल्यांनाच मिळणार विशिष्ट लाभ

एलॉन मस्क यांनी ट्विटरचा लोगो बदलण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता जेथे जेथे निळी चिमणी दिसत होती तिथं तिथं श्वानाचा लोगो दिसत आहे. ट्विटर पेज रिफ्रेश केल्यानंतरही सुरुवातीला हाच श्वानाचा लोगो दिसतो आणि मग होम पेज ओपन होते. ट्विटरच्या साईटवर डावीकडे सर्वात वरच्या बाजूला हा निळ्या चिमणीच्या जागी श्वानाचा लोगो दिसत आहे.