Magic Compose Beta Feature: गुगलने चॅटजीपीटी AI चॅटबॉटला टक्कर देण्यासाठी गुगल बार्डची सुरुवात केली. या चॅटबॉटमध्ये गुगलने Magic compose beta हे नवीन फीचर जोडण्यास सुरुवात केली आहे. गुगल बार्डमधील नव्या फीचरमुळे यूजर्संना AI टेकचा वापर करुन संदेशाचा मजकूर लिहिण्यास मदत होणार आहे. मॅजिक कम्पोज बीटा फीचरमुळे लिहिलेला मजकूर रीमिक्स, एक्साइटेड, चिल, शेक्सपियर, लिरिकल, फॉर्मल आणि शॉर्ट या सात वेगवेगळ्या स्टाइल्समध्ये रिफ्रेम करणे शक्य होणार आहे. सध्या फक्त RCS-enabled US SIM cards असलेल्या Android फोन्समध्ये ही सेवा उपलब्ध आहे.

मॅजिक कम्पोज बीटा पूर्णपणे रोलआउट झाल्यानंतर अ‍ॅपच्या सेटिंग्समध्ये बदल करुन हे फीचर वापरणे शक्य होणार आहे. यूजर्सना टेक्स फील्डमधील पेन्सिलच्या चिन्हावर जाऊन हे फीचर अ‍ॅक्टिव्ह करुन मजकूर वेगवेगळ्या टोन्स आणि स्टाइल्समध्ये रिेफ्रेम करणे शक्य होणार आहे. पण जर तुम्ही एंड-टू-एंड एन्क्रिप्शनसह RCS वापरत असलात, तर गुगलच्या सर्व्हरकडे सजेशन्स जनरेट करण्यासाठी मॅजिक कम्पोज बीटा फीचरद्वारे ‘पूर्वीचे २० मेसेज’ पाठवले जातील.

Difference between chia seeds and sabja
तुम्हाला आहारात ‘चिया सीड्स’ हवेत की सब्जा? दोन्हीमध्ये गोंधळ करू नका, ‘हे’ फरक लक्षात घ्या
The Hindustan Urvarak And Rasayan Limited Apply Online for 80 Various Posts Vacancies Check all the detailed
HURL Recruitment 2024 : एचयूआरएल अंतर्गत ‘या’ पदांसाठी होणार भरती; महिना १६ लाख पगार; जाणून घ्या शेवटची तारीख
Chaturgrahi Yog in meen rashi
Chaturgrahi Yog : १०० वर्षानंतर चतुर्ग्रही योग; ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा, होऊ शकतो मोठा धनलाभ
guru asta 2024
१४ दिवसांनी गुरु होणार अस्त! ‘या’ राशींच्या नशिबाचं टाळं उघडणार; नोकरीपासून प्रेमापर्यंत प्रत्येक कामात मिळू शकते यश

गुगल सजेशन्ससाठी पाठवलेले मेसेज, इमोजी, रिअ‍ॅक्शन्स आणि यूआरएल्स वापरुन त्याच्या मॅजिक कंपोझ सपोर्ट पेजची रुपरेषा ठरवणार आहे. कंपनीने या मेसेजेसचा वापर फक्त आणि फक्त सजेशन्स जनरेट करण्यासाठी केला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. शिवाय हे मेसेज गुगलकडे सेव्ह होणार नसून त्याचा वापर मशिनला ट्रेन करण्यासाठी केला जाणार आहे असेही म्हटले आहे. याव्यतिरिक्त अटॅचमेंट असलेले मेसेज, व्हॉईस मेसेज आणि फोटो पाठवले जाणार नसल्याची माहितीही समोर आली आहे. (फोटोंचे कॅप्शन्स आणि व्हॉइस ट्रान्सलेशन सजेशन्ससाठी पाठवले जाऊ शकतात.)

BGMI खेळताना अडचणी येत आहेत? स्मार्टफोनवर अपडेटेड Battlegrounds Mobile India खेळण्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स

मे महिन्यांच्या सुरुवातीला गुगलने मॅजिक कम्पोज बीटा या फीचरची माहिती लोकांना दिली होती. AI बार्डमधील या नव्या फीचरबाबत Google I/O इव्हेंटमध्ये याबाबत घोषणा देखील करण्यात आली होती. मॅजिक कम्पोज बीटा व्यतिरिक्त Search Generative Experience हे बार्डमधील फीचर देखील लवकरच रोलआउट होणार आहे. या फीचरमुळे यूजर्संना सर्च रिझल्ट्समध्ये सर्वात वर सारांशित उत्तरे पाहता येणार आहेत.