भारतात जेवढी लोक त्यांच्या फोनवर इंटरनेट चालवतात तेवढा इंटरनेटचा वापर इतर कोणत्याही देशात होत नाही. इंटरनेटवर फास्ट एक्सेससाठी, व्हिडीओ पाहण्यासाठी आणि मोबाईलमध्ये कोणत्याही व्यत्ययाशिवाय गेम खेळण्यासाठी सुरळीत इंटरनेट असणे आवश्यक आहे. यासाठी बहुतेक लोक त्यांचा फोन वाय-फायशी कनेक्ट ठेवतात. पण अनेक वेळा असे दिसून येते की फोन वाय-फायला जोडलेला असला तरी इंटरनेट खूप स्लो चालते. अशा वेळी मात्र खूप चिडचिड होते. तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही ट्रिक्स सांगणार आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये हाय स्पीडमध्ये वाय-फाय चालवू शकाल.

फ्रिक्वेंसी बैंड सेटिंग

फ्रिक्वेन्सी बँड स्मार्टफोनमधील वाय-फायचा वेग कमी करण्यात किंवा वेग वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. पूर्वीचे मोबाईल फोन २.५ GHz बँडला सपोर्ट करत असत, आजकाल स्मार्टफोन ५ GHz पर्यंत फ्रिक्वेन्सी बँडमध्ये समर्थित आहेत. वारंवारता बँड सेटिंग मॅन्युअली एडजस्ट केली जाऊ शकते, तरीही आम्ही शिफारस करतो की तुम्ही फ्रिक्वेंसी बँड ऑटो मोडवर सेट करा. असे केल्याने, स्पेक्ट्रम बँड म्हणजेच वाय-फाय उपकरणाद्वारे येणार्‍या फ्रिक्वेंसी नुसार स्मार्टफोन आपोआप बदलेल आणि इंटरनेट कोणत्याही व्यत्ययाशिवाय चालू राहील.

temperature affect the battery of mobile phones
विश्लेषण : तुमच्या स्मार्टफोनचीही बॅटरी ‘स्लो’ झालीय? हा  कडक तापमानाचा परिणाम असू शकतो…
Solar Ac That Does Cooling at Home Using Sun Energy Cost of Ac for 1 to 1.5 Ton
सोलार एसी वापरून सूर्यावर खेळ रिव्हर्स कार्ड! किंमत, फायदे पाहाच, आधीच घरी एसी असल्यासही करू शकता जुगाड
boys did dangerous stunt with car to make reels video went viral on social media
रिल्ससाठी जीवघेणा स्टंट! मित्राला प्लास्टिकच्या रॅपरमध्ये गुंडाळले अन् चालत्या कारच्या बाहेर…
This fan’s reaction after seeing Shubman Gill at hotel is viral Relatable much
“दिल मे बजी घंटी…टंग टंग टंग!” शुभमन गिलला समोर पाहताच चाहतीच्या काळजाचा चुकला ठोका! Viral Video एकदा बघाच

( हे ही वाचा: सूर्यप्रकाशात ठेवताच चार्ज होतो ‘हा’ पॉवरबँक? आता इलेक्ट्रिसिटीची गरज भासणार नाही)

कॅशे मेमरी

वेगवेगळ्या वेबसाईट्सवर सतत ऍक्सेस केल्यामुळे आणि त्यावर काम केल्यामुळे त्या वेबसाईट्सच्या नावाने सेव्ह होणारी कॅशे मेमरी कधी-कधी खूप जास्त साठवली जाते. कधीकधी ही मेमरी इतकी जड होते की ब्राउझर स्लो चालू होतो आणि आपल्याला वाटते की इंटरनेट स्पीड कमी झाला आहे. अशा परिस्थितीत, कॅशे मेमरी हटवण्याची गरज आहे. ब्राउझरच्या सेटिंग्जमध्ये जाऊन थेट कॅशे मेमरी साफ करता येऊ शकते. असे केल्याने ब्राउझर पुन्हा नव्याने वेग पकडेल.

मोडेम प्लेसमेंट

अनेकदा असे दिसून येते की घरात वाय-फाय बसवल्यानंतर एका खोलीत अगदी योग्य स्पीड असतो, पण दुसऱ्या खोलीत वेग कमी होतो. ही समस्या तुमच्या स्मार्टफोनची नसून त्या वाय-फाय राउटर किंवा मॉडेमची आहे. त्यामुळे वाय-फाय मॉडेम मोकळ्या जागेत ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून राउटरमधून बाहेर पडणाऱ्या वेव्स भिंती किंवा दरवाजांमुळे थांबणार नाहीत आणि जिथे तुम्ही तुमचा स्मार्टफोन घ्याल तिथे फोनमध्ये वेगवान इंटरनेट असू शकते.

( हे ही वाचा: ता ‘No Network’ मध्येही फोनवरून करता येणार कॉल! जाणून घ्या ‘या’ जबरदस्त ट्रिकबद्दल)

सॉफ्टवेअर अपडेट

फोनमधील वाय-फाय हळू चालण्याचे कारण फोनचे सॉफ्टवेअर / फर्मवेअर अपडेट नसणे हे देखील असू शकते. त्यासाठी नवीन अपडेट आहे की नाही हे स्वतः तपासणे चांगले आहे. आणि जर नवीन अपडेट उपलब्ध असेल तर ते फोनवर स्थापित करा आणि स्मार्टफोन अपडेट करा. तसंच अशा अपडेट्सनंतर फोन एकदा रीस्टार्ट देखील करा. स्टेप्स फॉलो केल्यानंतर, फोनमध्ये वाय-फाय पुन्हा वेगाने चालू होईल.

फोन कव्हर हे देखील एक मोठे कारण असू शकते

स्मार्टफोनला स्टायलिश लूक देण्यासाठी आजकाल विविध प्रकारचे आकर्षक मोबाइल कव्हर बाजारात विकले जातात. पण हे मोबाईल कव्हर्स स्मार्टफोनमधील वाय-फाय आणि इंटरनेटचा स्पीडही कमी करतात. मेटल कव्हर किंवा हार्ड प्लास्टिक शेल फोनच्या अँटेना बँडला कव्हर करते. त्याच वेळी, अशा कव्हरमुळे, वाय-फाय वेव्हस देखील नष्ट होतात, ज्यामुळे इंटरनेटचा वेग कमी होतो. कव्हरशिवाय वाय-फाय व्यवस्थित काम करत आहे की नाही ते एकदा तपासा. जर ते चालू असेल तर ते कव्हर न वापरणे चांगले.