वनप्लस कंपनी आज आपला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन ‘वनप्लस ओपन’ लॉन्च करणार आहे. वनप्लस आपल्या ”ओपन फॉर एव्हरीथिंग इव्हेंट” (Open for Everything event) मध्ये हा स्मार्टफोन लॉन्च केला जाणार आहे. वनप्लस ही एक लोकप्रिय मोबाइल उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन स्मार्टफोन्स लॉन्च करत असते. इव्हेंटच्या आधीच या फोनचे तपशील लीक झाले आहेत. याचे लीक झालेले फीचर्स आणि इतर तपशील कोणकोणते आहेत ते जाणून घेऊयात.

लीक झालेल्या काही रिपोर्टनुसार, वनप्ल ओपन या फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 SoC प्रोसेसरचा सपोर्ट दिला जाऊ शकतो. तसेच यामध्ये वापरकर्त्यांना १६ जीबी रॅम आणि ५१२ जीबी मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय कंपनी वनप्लस ओपन मध्ये इतर वनप्लसच्या स्मार्टफोनप्रमाणेच चांगला अनुभव ऑफर करणार आहे.

Grill coriander garlic fish recipe in marathi
ग्रिल्ड कोरिएन्डर गार्लिक फिश; असा बनवा कुरकुरीत मसाला फिश फ्राय
Samsung launched on Friday a new variant of its popular budget F15 smartphone Here is all the details
२० हजारांपेक्षा कमी किमतीत सॅमसंगचा ट्रिपल कॅमेरा सेटअपचा स्मार्टफोन; बॅटरी लाईफ बघून म्हणाल ‘डील Done’
Swiggy delivery boy was caught on cctv camera stealing shoes kept outside flat in Gurugram video goes viral
VIDEO : डिलीव्हरी बॉयने चोरले घराबाहेरील शूज, घटना सीसीटिव्ही कॅमेरात कैद, पाहा व्हिडीओ
restaurant inside metro coach nmrc introduces unique metro coach restaurant at sector 137 station know seating capacity read all details
आता मेट्रोमध्ये करु शकता पार्टी अन् मीटिंग; ‘या’ ठिकाणी सुरू होतेय मेट्रो कोच रेस्टॉरंट

हेही वाचा : VIDEO: लॉन्चिंगआधीच लीक झाली वनप्लसच्या ‘या’ फोल्डेबल स्मार्टफोनची किंमत; ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि…

वनप्लस ओपनमध्ये आधीच स्पष्ट केले आहे की, एक नवीन हिंज (hinge) सिस्टीम देण्यात येणार आहे. तसेच डिव्हाइसमध्ये एक अलर्ट स्लायडर फिचर देणार आहे. स्मार्टफोन कदाचित दोन रंगांमध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. वनप्लस आपल्या लॉन्चिंग इव्हेंटमध्ये वनप्लस ओपनची किंमत, अधिक माहिती स्पष्ट करेल.

OnePlus Open: कुठे आणि किती वाजता पाहता येणार लाइव्ह इव्हेंट?

वनप्लस आज आपला वनप्लस ओपन फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. यासाठी कंपनीने मुंबईमध्ये एक इव्हेंट आयोजित केला आहे. संध्याकाळी ७.३० वाजता हा इव्हेंट सुरू होणार आहे. वनप्लस कंपनीने या आधीच एक्स वर पोस्ट करून लॉन्चिंगची तारीख आणि वेळ सांगितली होती. हा लॉन्चिंग इव्हेंट कंपनीच्या अधिकृत युट्युब चॅनेलवर लाइव्ह पाहता येणार आहे.