वनप्लस कंपनी भारतात आपला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन ‘वनप्लस ओपन’ लॅान्च करणार आहे. वनप्लस ही एक लोकप्रिय मोबाइल उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन स्मार्टफोन्स लॉन्च करत असते. ज्यामध्ये नवनवीन फीचर्स आणि अपडेट्स असतात. १९ ऑक्टोबर रोजी वनप्लस ओपन भारतात लॉन्च होणार आहे. कंपनीने लॉन्चिंगची तारीख जाहीर केली असून इव्हेंटच्या आधीच या फोनचे तपशील लीक झाले आहेत. याचे लीक झालेले फीचर्स आणि इतर तपशील कोणकोणते आहेत ते जाणून घेऊयात.

वनप्लस ओपन फोल्डेबल स्मार्टफोन : लीक झालेले फीचर्स

वनप्लस ओपन या फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये ड्युअल डिस्प्लेचा देतात मिळू शकतो. तसेच आतील बाजूचा डिस्प्ले हा ७.८ इंचाचा AMOLED डिस्प्ले असू शकतो. तसेच बाहेरील डिस्प्ले हा ६.३१ इंचाचा AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. लीक झालेल्या माहितीनुसार, या दोन्ही डिस्प्लेचा रिफ्रेश रेट हा १२० Hz इतका असू शकतो. अपकमिंग वनप्लस ओपन फोल्डेबल स्मार्टफोन जुन्या अँड्रॉइड १३ OS वर चालतो. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.

Horizon investment of thousand crores in Chakan
होरायझनची चाकणमध्ये हजार कोटींची गुंतवणूक
Realme P1 Realme P1 Pro martphones will be available for purchase with Bank offers discounts and more
50MP कॅमेरा अन् फास्ट चार्जिंग सपोर्ट; रिअलमीच्या ‘या’ बजेट फ्रेंडली फोनची आज पहिली विक्री, जाणून घ्या आकर्षक सवलती
Vivo company New Smartphone T3x 5G launch in India on Know About design and price range of this upcoming model
50MP कॅमेरा अन् फास्ट चार्जिंग सपोर्टसह विवोचा ‘हा’ स्मार्टफोन होणार लाँच; किंमत फक्त…
Motorola launches Edge 50
बाकी कंपन्यांची उडाली झोप, मोटोरोलाचा जबरदस्त डिस्प्लेसह स्मार्टफोन देशात दाखल, मिळताहेत भरमसाठ ऑफर्स

हेही वाचा : VIDEO: भारतात लवकरच OnePlus लॉन्च करणार आपला ‘हा’ पहिला फोल्डेबल स्मार्टफोन, टिझर एकदा पाहाच

मात्र फीचर्सबद्दल कंपनीने कोणतीही अधिक माहिती दिलेली नाही. त्यामुळे अधिक माहितीसाठी लॉन्चिंग इव्हेंटची वाट बघावी लागणार आहे. हुड अंतर्गत वनप्लस ओपनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 चिपसेटचा सपोर्ट दिला जाऊ शकतो. फोन LPDDR5x रॅम आणि 4.0 स्टोरेजच्या स्पोर्टसह लॉन्च होण्याची शक्यता आहे. तसेच वापरकर्त्यांना यामध्ये १६ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटर्नल स्टोरेजचा सपोर्ट मिळू शकतो. तसेच कंपनी यामध्ये अलर्ट स्लायडर हे फिचर देखील देऊ शकते. तसेच फोनमध्ये ४८०० mAh क्षमतेची बॅटरी आणि ६७W चे फास्ट चार्जिंग देखील मिळू शकते. लीक झालेल्या माहितीनुसा, वनप्लस ओपनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. ज्यामध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा. ४८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेन्सर आणि ६४ मेगापिक्सलची पेरीस्कोप लेन्स असू शकते. सेल्फी आणि व्हिडिओसाठी ३२ मेगापिक्सलचा प्रायमरी आणि २० मेगापिल्क्सचा दुसरा कॅमेरा मिळू शकतो.

वनप्लस ओपन फोल्डेबल स्मार्टफोन: भारतातील अपेक्षित किंमत

टिपस्टर अभिषेक यादव यांनी एक्स वर दिलेल्या माहितीनुसार, वनप्लस ओपन ची किंमत अंदाजे १,३९,९९९ रुपये असण्याची शक्यता आहे. ही किंमत अधिकृत किंमत नाही. अधिकृत किंमत ही लॉन्चिंग इव्हेंटमध्ये कळू शकणार आहे. तसेच हा फोन लॉन्च झाल्यानंतर २७ ऑक्टोबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.