scorecardresearch

सर्वाधिक मोबाईल डाउनलोडींग स्पीड कतारकडे, भारत कितव्या स्थानी? जाणून घ्या

जागतिक स्तरावर सिंगापूरचा स्पीड हा २२५.७१ एमबीपीएस इतका आहे.

सर्वाधिक मोबाईल डाउनलोडींग स्पीड कतारकडे, भारत कितव्या स्थानी? जाणून घ्या
Mobile Internet Speed – संग्रहित छायाचित्र / लोकसत्ता

Ookla ची स्पीडटेस्ट ग्लोबल इंडेक्सने अजून सुरु ठेवली आहे. या स्पीड टेस्टमध्ये भारताचा क्रमांक हा २६ वा आहे. Ookla च्या स्पीडटेस्ट ग्लोबल इंडेक्सने भारतातील मोबाइल डाउनलोडिंग स्पीड २५.२९ Mbps वर ठेवला आहे तर अपलोडिंग स्पीड ५.५१ Mbps आहे. हा डेटा कंपनीच्या डिसेंबर २०२२ च्या आकडेवारीतून समोर आला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे जागतिक स्तरावर मोबाईल इंटरनेट स्पीड रँकिंगमध्ये आता भारत २६ व्या स्थानावर पोहोचले आहे.

याउलट भारतातील फिक्स ब्रॉडबँड युजर्ससाठी डाउनलोड स्पीड हा डिसेंबर २०२२ च्या मध्यात ४९.१४ एमबीपीएस इतका होता. तर अपलोडींगचा स्पीड हा ४८.५१ एमबीपीएस इतका होता. एकूणच फिक्स ब्रॉडबँड चार्टमध्ये भारताची एका स्थानाने घसरण झाली आहे.

हेही वाचा : Apple च्या भारतात होणाऱ्या उत्पादनावर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचं मोठं विधान; म्हणाले…

जागतिक स्तरावर कतार हा देश मोबाईल डाउनलोड स्पीड टेस्ट मध्ये अव्वल क्रमांकावर आहे. याचा स्पीड हा १६९.५१ एमबीपीएस इतका आहे. तर सिंगापूरचा स्पीड हा २२५.७१ एमबीपीएस इतका आहे. ब्रॉडबँड स्पीड मध्ये सिंगापूर आघाडीवर आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-01-2023 at 15:34 IST

संबंधित बातम्या