Instagram lunch GIFs new feature: फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग अ‍ॅप इंस्टाग्रामने एक नवीन फिचर लॉन्च केले आहे ज्याची वापरकर्ते बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. अखेर इंस्टाग्रामवर कमेंट करताना आता GIFs वापरता येणार आहे. कंपनीचे प्रमुख अ‍ॅडम मोसेरी यांनी मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्गसोबत इंस्टाग्राम चॅनेलवर संवाद साधताना नवीन फिचरची माहिती दिली.

इंस्टाग्रामच्या कमेंट सेक्शनमध्ये GIFचा होईल वापर

Job opportunity in CBI apply immediately
सीबीआयमध्ये नोकरी करण्याची संधी, त्वरित अर्ज करा…
sarkari naukri nhpc recruitment 2024
NHPC Recruitment 2024 :कोणत्याही परीक्षेशिवाय मिळवा सरकारी नोकरी; ‘या’ पदांसाठी भरती सुरू; ३० एप्रिलपूर्वी करा अर्ज
Facebook Update video player In vertical full screen That Offers alongside video playback controls
फेसबुक देणार इन्स्टाग्राम Reels ला टक्कर! नवीन अपडेटमध्ये होणार ‘हा’ बदल, जाणून घ्या
Airtel Xtreme
लाईट्स, कॅमेरा, XStream : तुमचं वन स्टॉप एन्टरटेन्मेंट हब

इंस्टाग्रामच्या वापरकर्त्याना अधिक चांगला, अधिक सर्जनशील आणि आणखी मजेदार अनुभव मिळावा यासाठी हे फिचर आणले आहे. तसेच, GIFS वापरकर्त्यांना अधिक संवाद साधण्याची संधी देते. GIF चा वापर वापरकर्त्यांद्वारे संभाषणांमध्ये विनोद करण्यासाठी, पोस्टवर त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी किंवा त्यांच्या कमेंट अधिक आकर्षित करण्यासाठी केला जातो.

असे वापरू शकता GIF

इन्स्टाग्रामवरील GIF जसे ते फेसबूकसाठी वापरले जाते अगदी तसेच वापरले जाईल. वापरकर्ते एकतर GIF लायब्ररीमध्ये जाऊन वापरु शकतात किंवा विशिष्ट Giphy शोधू शकतात. तुम्ही इंस्टाग्रामवर जसे कमेंट करता अगदी तसेच कमेंट बॉक्समध्ये GIF वापरू शकता.

कमेंटमध्ये Giphyवर क्लिक केल्यास तुम्हाला ट्रेंडिंग GIF दिसतात आणि इतर GIF देखील तिथे शोधू शकता.

हेही वाचा – Meta मध्ये एका वर्षात चौथा राजीनामा; आता ‘या’ मोठ्या अधिकाऱ्याने कंपनीला रामराम ठोकला

मोसेरी पुढे म्हणाले की, ”इंस्टाग्राम रील्समध्ये लिरिक्स नावाच्या नवीन फिचरची चाचणी करत आहे.”