Instagram down viral memes : इन्स्टाग्राम हे सोशल मीडिया आज [२२ मार्च] सकाळपासून ‘डाऊन’ असल्याचे डाऊन डिटेक्टर डॉट कॉम [Downdetector.com] या साईटच्या माहितीवरून समजते. त्यांच्या माहितीनुसार, “बऱ्याच इन्स्टाग्राम वापरकर्त्यांच्या अहवालानुसार इन्स्टाग्राममध्ये काहीतरी बिघाड असल्याचे समजते.”

Downdetector.com या आउटेज ट्रॅकिंग वेबसाइटनुसार, सकाळी साडे सहाच्यादरम्यान इन्स्टाग्राम ॲपमध्ये काहीतरी बिघाड असल्याच्या ४८८ तक्रारी आल्या होत्या. तसेच, इनसाइडर पेपरच्या माहितीनुसार अनेक इन्स्टाग्राम वापरकर्त्यांना त्यांचे इन्स्टाग्राम अकाउंट आपोआप लॉगआउट होत असल्याच्या समस्या येत असल्याचे समजते. Downdetector.com या साइटवरसुद्धा ७० टक्के लॉगिनच्या तक्रारी असून, १९ टक्के वापरकर्त्यांना ॲपचा त्रास होत असून, ११ टक्के वापरकर्ते सर्व्हर कनेक्शनच्या समस्यांचा सामना करत होते; अशी माहिती मिंटच्या एका लेखावरून समजते.

point of view All India Entrance Exam presentation
ताणाची उलगड: स्वत:चा दृष्टिकोन बदला
Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
12 different products in maharastra received gi tags
तुळजापूरच्या कवड्याच्या माळेसह कोणत्या उत्पादनांना मिळाले जीआय मानांकन? जाणून घ्या सविस्तर…
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”

डाउनडिटेक्टर त्यांच्या प्लॅटफॉर्मवर, वापरकर्त्यांनी पाठवलेल्या त्रुटींसह, इतर सोर्सेसकडून एकंदरीत परिस्थितीचा अहवाल एकत्र करून आउटेजचा मागोवा घेत असल्याचे समजते.

आउटेज ट्रॅकिंग वेबसाइटनुसार, इन्स्टाग्राम हे काल म्हणजे २१ मार्च रोजीदेखील हजारो वापरकर्त्यांसाठी डाउन होते. अमेरिकेतील जवळपास पाच हजारांपेक्षा अधिक वापरकर्त्यांनी त्यांना फोटो-शेअरिंग प्लॅटफॉर्मवर लॉगिन करताना समस्या येत असल्याची तक्रार केल्याचे, डाउनडिटेक्टरच्या डेटाने दाखवले आहे.

काही दिवसांपूर्वी म्हणजे ५ मार्च रोजीदेखील फेसबुक आणि इन्स्टाग्रामला अशाच आउटेजचा सामना करावा लागला होता. ही समस्यादेखील भारत आणि इतर देशांमधील वापरकर्त्यांना उद्भवली होती. त्यावेळेस दोन्ही माध्यमांवर लॉगिनची तक्रार होती. तसेच ॲप रिफ्रेश न होणे, आपोआप लॉगआउट अशा प्रकारच्या गोष्टी उद्भवत होत्या. इतकेच नाही तर अनेक वापरकर्त्यांना त्यांना त्यांचा पासवर्डदेखील बदलण्यासाठी सांगण्यात आले होते.

दरम्यान, इन्स्टाग्राम डाउन झाले आहे हे समजल्यावर नेटकऱ्यांनी आणि मिमर्सने या संधीचा फायदा घेऊन मिम्स आणि विनोदी व्हिडीओचा पाऊस पाडला आहे. त्यापैकी काही फोटो आणि व्हिडीओ खाली पाहा.

असे आणि यांसारखे विविध मिम्स इंटरनेटवर तुम्हाला पाहायला मिळतील.