अ‍ॅपल कंपनीने १२ सप्टेंबर रोजी आपली बहुप्रतीक्षित अशी आयफोन १५ सिरीज लॉन्च केली आहे. या सिरीजमधील मॉडेल्समध्ये कंपनीने यंदा काही नवीन फीचर्स दिले आहेत. या सिरीजमध्ये आयफोन १५, आयफोन १५ प्लस , आयफोन १५ ५प्रो मॅक्स या चार मॉडेल्सचा समावेश आहे. या मॉडेल्सची विक्री भारतासह सर्वत्र सुरु आहे. सध्या आयफोन १५ सिरीजमधील आयफोन १५ हे मॉडेल १२८ जीबी स्टोरेज असणारा आयफोन १५ भारतात सध्या ७९,९०० रुपयांमध्ये उपलब्ध आहे. आयफोन १५ मॉडेलवर फ्लिपकार्ट या वेबसाइटवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळे हा फोन खरेदीदारांना स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. तर आयफोन १५ स्वस्तात कसा खरेदी करता येऊ शकतो हे जाणून घेऊयात.

आयफोन १५ कंपनीच्या आयफोन १५ सिरीजमधील सर्वात परवडणारे मॉडेल आहे. आयफोन १५ हा एक ऍडव्हान्स मॉडेल आहे. आयफोन १५ मध्ये कंपनीने अनेक नवीन फीचर्स दिले आहेत. कंपनीने आयफोन १५ मध्ये ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा सेटअप, यूएसबी सी पोर्ट, नवीन चिपसेट, डायनॅमिक आयर्लंड आणि अनेक नवीन फीचर्स दिले आहेत. आयफोन १५ ची किंमत साधारणपणे आयफोन १४ प्रमाणेच ठेवण्यात आली आहे. याबाबतचे वृत्त dnaindia ने दिले आहे.

vodafone idea loss of rs 7675 crore in the march quarter
व्होडा-आयडियाला मार्च तिमाहीत ७,६७५ कोटींचा तोटा
Best Selling SUV Car
मारुती, ह्युंदाईच्या कार नव्हे तर देशातील ‘या’ सर्वात स्वस्त SUV ची तुफान खप, मायलेज २६ किमी, किंमत…
india ratings forecast gdp growth estimate to 7 1 pc in fy25
विकासदर २०२५ मध्ये ७.१ टक्क्यांवर! इंडिया रेटिंग्जच्या सुधारीत अंदाजात ६० आधारबिंदूंनी वाढ  
Sensex, Nifty, Nifty pulls back,
‘सेन्सेक्स’ला ७०० अंशांची झळ; ‘निफ्टी’ विक्रमी पातळीपासून माघारी
Best cheapest bikes
३९ हजार रुपये किंमत, १ लिटर पेट्रोलमध्ये धावते ११० किमी; ‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त बाईक, पाहा यादी
Companies weakest quarterly revenue growth since September 2021
कंपन्यांची  सप्टेंबर २०२१ नंतर सर्वात कमकुवत तिमाही महसुली वाढ; ‘क्रिसिल’च्या अहवालाचा दावा
Tata Punch Car sale
टाटाच्या ‘या’ सर्वात स्वस्त SUV नं Wagon R, Dzire चं वर्चस्व संपवलं? झाली दणक्यात विक्री, मायलेज २६ किमी
kasturi cotton
कस्तुरी कॉटन…देशातील सर्वोत्तम कापूस!

हेही वाचा : ‘एक्स’ची मोठी कारवाई! ५ लाखांपेक्षा अधिक भारतीय अकाउंट्सवर घातली बंदी, काय आहे कारण?

काय आहेत ऑफर्स ?

आयफोन १५ चे १२८ जीबी स्टोरेज असलेले मॉडेल भारतात सध्या ७९,९०० रुपयांना उपलब्ध आहे. मात्र खरेदीदारांना या फोनवर फ्लिपकार्ट ४०,६५० रुपयांचा डिस्काउंट देत आहे. म्हणजेच खरेदीदार आयफोन १५ हा फोन ३९,२५० रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. आयफोन १५ फ्लिपकार्ट ७९,९०० रुपयांमध्ये उपलब्ध आहे. खरेदीदारांना आयसीआयसीआय बँकेच्या डेबिट कार्डच्या ईएमआय व्यवहारांवर १,५०० रुपयांची सूट मिळू शकते. यामुळे आयफोन १५ ची किंमत कमी होऊन ७८,४०० रुपये होते. याशिवाय फ्लिपकार्ट तुमच्या जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात ३९,२५० रुपयांची सूट देत आहे. याचाच अर्थ सर्व बँक ऑफर्स डिस्काउंटसह आयफोन १५ तुम्ही फ्लिपकार्टवरून ४०,६५० रुपयांच्या डिस्काउंटनंतर केवळ ३९,२५० रुपयांमध्ये खरेदी करू शकता,.