Google I/O 2024 Live Updates Today : गुगलच्या वार्षिक डेव्हलपर कॉन्फरन्सला अवघ्या अडीच तासांमध्ये कॅलिफोर्नियात सुरुवात होत असून संपूर्ण जगाचे लक्ष त्याकडे लागून राहिले आहे. भारतात आज मंगळवारी १०:३० वाजता या लाईव्ह इव्हेंटची सुरुवात होईल. गुगलचे सीइओ सुंदर पिचई याच परिषदेत अवघं जग कवेत घेणाऱ्या मोबाईलवरील अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमच्या नव्या आवृत्तीची अर्थात अँड्रॉइड १५ ची घोषणा करतील, अशी चर्चा आहे.

Live Updates

Google I/O 2024 Live Today, 14 May 2024 : लाईव्ह अपडेट्स वाचा

00:39 (IST) 15 May 2024

जेमिनाय AI ची YouTube लाही जोड!

(फोटो सौजन्य: Anuj Bhatia/The Indian Express)

00:27 (IST) 15 May 2024
काळजी करू नका!

AI चा जबाबदारीने केलेला वापर देईल खात्रीपूर्वक सुरक्षा, काळजी करू नका! - गुगलची हमी...

(फोटो सौजन्य: Google / युट्युब )

00:21 (IST) 15 May 2024

अँड्रॉइड १५ चे लाँचिंग उद्या नक्की. AI ची जादू आता मोबाईलवरही!

(फोटो सौजन्य: Google / युट्युब )

00:19 (IST) 15 May 2024

जनरेटिव्ह AI अल्फाफोल्ड करतंय 80 देशांमधील पूरस्थिती रोखण्यासाठी मदत...

(फोटो सौजन्य: Google / युट्युब )

00:09 (IST) 15 May 2024
गुगल AI स्टुडिओ !

गुगल AI स्टुडिओ व्यावसायिकांसाठी...

(फोटो सौजन्य: Google / युट्युब )

00:00 (IST) 15 May 2024

विद्यार्थ्यांसाठी जेमिनी AI असणार स्टडीबडी! AI सोबत करा अभ्यास! सॅमसंगबरोबर सर्कल द सर्च!

(फोटो सौजन्य: Google / युट्युब )

23:53 (IST) 14 May 2024

स्प्रेडशीटमधील आकडेमोडीचेही जेमिनाय AI करेल विश्लेषण, सांगेल काय आहे फायदेशीर आणि कशात होतोय तोटा!

(फोटो सौजन्य: Google / युट्युब )

23:52 (IST) 14 May 2024

तुमच्या कुटुंबाच्या आवडी आणि बजेट समजून घेऊन सुट्टीचे प्लानिंगही करेल गुगल जेमिनाय AI!

(फोटो सौजन्य: Google / एक्स )

https://twitter.com/Google/status/1790445548715024536

23:43 (IST) 14 May 2024

गुगल जस्ट आस्क- समस्या सांगा तेच करेल विचार तुमच्यासाठी आणि सेकंदात देईल पर्यायी उत्तरे!

(फोटो सौजन्य: Google / युट्युब )

23:41 (IST) 14 May 2024

जीमेलमधील न वाचलेल्या (अनरीड) मेल्समधील संक्षिप्त माहिती मिळवा मोबाईल कार्डमध्ये AI च्या मदतीने सेकंदभरात!

(फोटो सौजन्य: Google / युट्युब )

23:39 (IST) 14 May 2024

गुगल वर्कस्पेसमध्ये चीप AI करणार को- ऑर्डिनेशनसाठी मदत...

(फोटो सौजन्य: Google / युट्युब )

23:33 (IST) 14 May 2024
व्हिडिओ सुरू करा, विचारा प्रश्न

काही करताना अडचण आली तर व्हिडिओ सुरू करा, विचारा प्रश्न- गुगल AI ओव्हरव्ह्यू देईल उत्तर!

(फोटो सौजन्य: Google / युट्युब )

23:29 (IST) 14 May 2024
गुगलचे नेटवर्क आता प्रगत होणार!

२० लाख मैलांचे गुगलचे नेटवर्क आता अधिक प्रगत होणार! पायाभूत सुविधांवरही गुगलचा भर- सुंदर पिचाई , सीइओ- गुगल

(फोटो सौजन्य: Google / युट्युब )

23:26 (IST) 14 May 2024
AI ओव्हरव्ह्यू :

गुगल सर्चला समस्या सांगा आणि नेमके उत्तर मिळवा अवघ्या सेकंदभरात!

गुगल सर्चला समस्या सांगा आणि नेमके उत्तर मिळवा अवघ्या सेकंदभरात!

23:23 (IST) 14 May 2024
AI सुचवेल सर्वोत्तम रेस्टॉरंट!

AI ओव्हरव्ह्यूला विचारा जेवण काय करायचे? समोर येईल पुढच्या तीन दिवसांची मेन्यू लिस्ट! डिश सांगा AI सुचवेल सर्वोत्तम रेस्टॉरंट, तिथले उत्तम टेबल आणि सांगेल उपलब्ध ऑफर्सही!

(फोटो सौजन्य: Google / युट्युब )

23:17 (IST) 14 May 2024
व्हिओ (Veo) -

जनरेटिव्ह व्हिडिओ AI सिनेमॅटिक स्टाइलमध्ये तयार होणार व्हिडिओ AI च्या मदतीने!

(फोटो सौजन्य: Anuj Bhatia/The Indian Express)

23:15 (IST) 14 May 2024
स्वर आणि शब्दही घेणार जन्म!

गुगल म्युझिक AI सँडबॉक्स - जगभरातील संगीतकारांच्या मदतीसाठी... नव्या संगीताचा जन्म... लयीला जुळणारे स्वर आणि शब्दही घेणार जन्म!

https://twitter.com/GoogleDeepMind/status/1790435413682975043

23:14 (IST) 14 May 2024

फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ... काहीही सांगा AI नेमके ओळखणार, तुम्हाला मदत करणार आणि सेकंदात माहिती देणार इमॆजिन थ्री - गुगल जेमिनी AI

https://twitter.com/GoogleDeepMind/status/1790434750592643331

23:13 (IST) 14 May 2024

कॅमेऱ्यातून दिसणाऱ्या जगातील कोणत्याही ठिकाणांची, वस्तूंची माहिती थेट सांगेल AI एजंट पुढच्याच सेकंदाला!

https://twitter.com/GoogleDeepMind/status/1790433540548558853

23:07 (IST) 14 May 2024
मल्टिमोडल AI प्रोजेक्ट Astra :

युनिव्हर्सल AI एजंट करणार दैनंदिन आयुष्यात प्रत्येकाला मदत! दैनंदिन आयुष्यही आता बदलेल!

(फोटो सौजन्य: Anuj Bhatia/The Indian Express)

23:03 (IST) 14 May 2024
जोश वूडवर्ड :

जेमिनी AI आता अभ्यासही करणार सोपा. नोट्स मधून तुम्हाला शिकवणार, थेट वर्गातील शिक्षकांसारखं! विज्ञान शिकणे होईल सोपे...

23:01 (IST) 14 May 2024

गुगलचे जेमिनी 1.5 प्रो AI जगभरातील डेव्हलपर्ससाठी खुले...

(फोटो सौजन्य: Anuj Bhatia/The Indian Express)

23:00 (IST) 14 May 2024

Ask photos जेमिनीचा AI चा अवतार!

(फोटो सौजन्य: Anuj Bhatia/The Indian Express)

22:59 (IST) 14 May 2024

जेमिनी 1.5 आता जग बदलणार! देणार आजवरचा आश्चर्यकारक अनुभव!

(फोटो सौजन्य: Anuj Bhatia/The Indian Express)

22:57 (IST) 14 May 2024

अल्फाफोल्ड थ्री जेमिनी 1.5 फ्लॅश व्हायरसच्या डीएनएचा घेणार वेध! वैद्यकीय संशोधनात जगभरातील संशोधकांना होणार मोठी मदत!

(फोटो सौजन्य: Google / युट्युब )

22:54 (IST) 14 May 2024

6 दशकोटी फोटो दरदिवशी अपलोड होतात. आता जेमिनीला विचारा ती देईल फोटो शोधून...

(फोटो सौजन्य: Google / युट्युब )

22:50 (IST) 14 May 2024

आता जीमेल मधील शोधही जेमिनी AI करणार सोपे. विषय सांगा तुम्हाला मिळणार थोडक्यात माहिती मिनिटभरात!

(फोटो सौजन्य: Google / युट्युब )

Google I/O 2024 Live Updates Today, 14 May 2024 : लाईव्ह अपडेट्स वाचा