एआय हा विषय अधिक प्रमाणात चर्चेत आहे. सध्या एआय संशोधनाला अधिकाधिक गती देण्यासाठी विविध कंपन्या शर्थीचे प्रयत्न करत आहेत. प्रत्येक प्रोडक्टमध्ये एआय कसा वापरला जाईल, त्याचा युजर्सना कसा फायदा होईल याकडे विशेष लक्ष दिले जाते आहे. काही दिवसांपूर्वी सॅमसंग कंपनीने एआय वॉशिंग मशीन आणि टीव्ही लाँच केला; तर आता या कंपनीला टक्कर देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि स्मार्टफोन बनवणारी कंपनी एलजी (LG) मोबाइल, वॉशिंग मशीन, फ्रिज नंतर त्यांचा पहिला वाहिला एआय टीव्ही लाँच करत आहे.
एलजी (LG) कंपनीने भारतात AI चा स्मार्ट टीव्ही लाँच केला आहे. हा जगातील सर्वात मोठा ओएलईडी (OLED) स्मार्ट टीव्ही असणार आहे. LG OLED evo AI आणि LG QNED AI TV असे या एआय स्मार्ट टीव्हीचे नाव आहे. या स्मार्ट टीव्हीमध्ये 97-इंच 4K स्मार्ट टीव्ही, इन-हाउस α11 AI प्रोसेसर आणि webOS द्वारे सपोर्ट करतो.LG च्या मते, हे टेलिव्हिजन एआय upscaling आणि एआय पिक्चर प्रोसारख्या तंत्रज्ञानाने परिपूर्ण आहे; जे टीव्हीची स्क्रिन पिक्सेलसारखे फोटो शार्प करण्यासाठी AI चा उपयोग करतात.
LG कंपनीने लाँच केलेला टीव्ही ४२ इंच ते ९७ इंचांपर्यंत आहे. हे मॉडेल 4K पर्यंतचे रिझोल्यूशन, 144Hz अल्ट्रा-फास्ट रिफ्रेश रेट, HDMI 2.1 पोर्ट यासारखे तंत्रज्ञान देतात आणि ते NVIDIA G-SYNC आणि AMD FreeSync प्रमाणित आहेत; जे गेमिंग मॉनिटर म्हणून काम करतात. तसेच टीव्ही व्हर्च्युअल ९.१.२ सराउंड साउंड तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत. एआय स्मार्ट टीव्हीच्या इतर प्रमुख फीचर्समध्ये पाच वर्षांपर्यंतचे सॉफ्टवेअर सपोर्ट (webOS), डॉल्बी ॲटमॉस (Dolby Atmos), डॉल्बी व्हिजन (Dolby Vision) यांचा समावेश आहे. हे टेलिव्हिजन Apple AirPlay आणि Google Chromecast आदी वायरलेस स्क्रिनला सपोर्ट करतात.
LG कंपनीकडून लाँच करण्यात आलेल्या AI टीव्ही मॉडेल्सच्या किमती पुढीलप्रमाणे आहेत…
43-इंच QNED82T मॉडेल ६२,९९० रुपयांपासून सुरू होते. ६५ इंच LG QNED90T (मिनी एलईडी) ची किंमत १,८९,९९० रुपये, 42-इंच स्क्रीनसह सर्वात स्वस्त ओईएलडी मॉडेलची किंमत १,१९,९९० रुपये, LG OLED evo G4 AI, 55-इंच मॉडेलची किंमत २,३९,९९० रुपये आहे.