Microsoft Surface Event Launch: ऍपल व गूगलच्या वार्षिक इव्हेंट पाठोपाठ आज मायक्रोसॉफ्टही नव्या भन्नाट फीचर्ससह खास प्रोडक्ट्स लाँच करणार आहे. आज संध्याकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी मायक्रोसॉफ्ट सरफेस इव्हेंटचे लाईव्ह स्ट्रीमिंग सुरु होणार आहे . माइक्रोसॉफ्टच्या अधिकृत वेबसाईटसह सोशल मीडियावरही आपण हा लाँच पाहू शकता. दरम्यान आज मायक्रोसॉफ्टतर्फे प्रो 5 लॅपटॉप, प्रो 9 टॅबलेटसह अन्यही गॅजेट लाँच केले जाणार आहेत. या नवीन गॅजेट्समध्ये ग्राहकांना नेमक्या कोणत्या सुविधांचा लाभ घेता येणार आहे जाणून घेऊयात…

प्राप्त माहितीनुसार, मायक्रोसॉफ्टच्या सरफेस इव्हेंटमध्ये सरफेस नोटबुक, सरफेस प्रो ९ टॅबलेट, सरफेस प्रो 5 लॅपटॉप, सरफेस स्टूडियो 3 PC लाँच होणार आहे. AI व ARM तंत्रज्ञानावर आधारित नवी उपकरणे ही क्लासिक लुक व वेगवान वापर करण्याची मुभा युजर्सना देईल असे समजत आहे.

sarkari naukri nhpc recruitment 2024
NHPC Recruitment 2024 :कोणत्याही परीक्षेशिवाय मिळवा सरकारी नोकरी; ‘या’ पदांसाठी भरती सुरू; ३० एप्रिलपूर्वी करा अर्ज
viral video of Monalisa singing
चित्रातील मोनालिसा बनली रॅप गायिका! पाहा मायक्रोसॉफ्टच्या ‘या’ App ची कमाल; Video होतोय व्हायरल….
Dolly Chaiwala and Bill Gates
Dolly Chaiwala मायक्रोसॉफ्ट विंडोज १२चा ब्रँड अँबॅसेडर? जाणून घ्या सत्य
DRDO ACEM Nashik Recuritment 2024
DRDO ACEM नाशिकद्वारे अप्रेंटिसच्या पदासाठी होणार भरती! ३० एप्रिलपर्यंत करू शकता अर्ज, जाणून घ्या पात्रता निकष

सरफेस प्रो 9 टॅबलेट

रिपोर्ट्सनुसार आज लाँच होणारा सरफेस प्रो 9 टॅबलेट मध्ये १३ इंच स्क्रीन व १२० Hz रिफ्रेश रेट पाहायला मिळू शकते. अतिरिक्त वापरासाठी यात स्लिम पेन देण्यात येईल. तसेच ५ मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा व १० मेगापिक्सेल बॅक कॅमेरा या टॅबलेटमध्ये देण्यात येऊ शकतो. 12th Gen आधारित या टॅबलेटमध्ये i5 व i7 कोर स्ट्रेंथ पाहायला मिळेल असे तज्ज्ञांचे अंदाज आहेत. विंडोज 11 OS सह उपलब्ध टॅबलेट ८ च्या तुलनेत टॅबलेट प्रो अधिक वेगवान असू शकतो. मुख्य म्हणजे यात 5G कनेक्टिविटीसह 32GB RAM व 1TB स्टोरेज उपलब्ध आहे.

सरफेस प्रो 5 लॅपटॉप

सोशल मीडियावरील टेक एक्सपर्टच्या माहितीनुसार सरफेस प्रो 5 लॅपटॉपमध्ये इंटेल प्रोसेसर दिला जाऊ शकतो मात्र AMD राइजन APUs प्रोसेसर हटवण्याचा कंपनीचा विचार आहे. i5-1235U व i-71255U कोर स्ट्रेंथ असूनही लॅपटॉपमध्ये फार बदल होण्याची शक्यता कमी आहे.

सरफेस स्टूडियो 3 PC

मागील वर्षी लाँच झालेल्या स्टूडियो कॉम्प्युटरप्रमाणेच सरफेस स्टूडियो 3 कॉम्प्युटरचे डिझाईन असू शकते. यामध्ये 11th Gen Core i7 प्रोसेसर नव्याने समाविष्ट केला जाऊ शकतो. तसेच डॉल्बी व्हिजन HDR व्हिज्युअल्स व डॉल्बी एटमोस ऑडियोसह वेबकॅममध्ये अपडेट आणले जाऊ शकतात. प्राप्त माहितीनुसार या नव्या कॉम्प्युटरमध्ये 32GB RAM व 1TB SSD सह एकच स्टोरेज उपलब्ध असेल.

मायक्रोसॉफ्टने ‘बिल्ड 2022’ इव्हेंटमध्ये विशेषतः कोडिंग करणाऱ्या ऍप डेव्हलपर्सच्या गरजा लक्षात घेऊन कॉम्प्युटर लाँच केला होता. यंदाच्या सोहळ्यात लाँच होणाऱ्या उत्पादनाच्या किमती या मागील वर्षीच्या तुलनेत फार वाढणार नाहीत असे अंदाज आहेत. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. नवीन उत्पादने व किंमत याबाबत आज संध्याकाळी ठोस माहिती समोर येईल.