नोकियाने आता टेलिकॉम कंपन्यांना विश्लेषण, सुरक्षा आणि डेटा व्यवस्थापनासाठी सॉफ्टवेअर सर्व्हिस सुरु करण्याची योजना आखली आहे. अनेक तंत्रज्ञान कंपन्यांचा याकडे कल असल्याचं दिसून येत आहे. आता नोकियाने सुविधा सुरु करण्याच निर्णय घेतला असून टेलिकॉम कंपन्यांशी बोलणी सुरु केली आहे. नोकियाचे काही सॉफ्टवेअर पोर्टफोलिओ या वर्षापासून सबस्क्रिप्शन अंतर्गत ऑफर केले जातील. तर अधिक 2022 च्या सुरुवातीस व्यावसायिकरित्या उपलब्ध होतील. 5 जी नेटवर्कमुळे येत्या काळात सायबर सुरक्षेचा प्रश्न उभा राहणार आहे. या सुविधेमुळे हा धोका टाळता येऊ शकतो. ही सुविधा सायबर हल्लेखोर शोधून काढण्यासाठीचा वेळ कमी करते. तसेच 5 जी ग्राहक आणि कंपनीला सुरक्षा प्रदान करते.

“नोकियाने २०१६ मध्ये सॉफ्टवेअर विभाग तयार केला होता. तेव्हा देखील सदस्यता घेण्याची कल्पना होती. परंतु आम्ही कधीही कार्यान्वित केले नाही.”, असं वरिष्ठ उपाध्यक्ष मार्क बनने एका मुलाखतीत सांगितले. “आता आम्ही त्या दृष्टीने पावलं उचलली आहेत. आम्ही मोठ्या प्रमाणावर कार्य करण्यास सक्षम होण्यासाठी अंतर्निहित तंत्रज्ञान तयार केले आहे.” असंही त्यांनी पुढे सांगितलं.

नोकिया दीर्घकालीन वापरासाठी संभाव्य ग्राहकांशी चर्चा करत आहे, क्लाउड-आधारित सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म खर्च कमी करू शकतो. २०२१- २०२५ कालावधीसाठी ३.१ अब्ज अमेरिकन डॉलर्सची उलाढालीचं लक्ष्य आहे,. वार्षिक वाढीचा दर सुमारे २५ ते ३० टक्के असणार आहे.