OnePlus या मोबाईल तयार करणाऱ्या कंपनीने काल आपला एक नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. OnePlus Nord CE 3 Lite हा फोन कंपनीने लॉन्च केलं असून त्यासह कंपनीने OnePlus Nord Buds 2 सुद्धा कालच्या इव्हेंटमध्ये लॉन्च केले आहेत. कंपनीने या बड्समध्ये सर्वोत्तम Bass आणि स्पष्ट ऑडिओ क्वालिटी असल्याचा दावा केला आहे. OnePlus Nord Buds 2 मध्ये AI अल्गोरिदम देखील दिलेला आहे. आज आपण या इअरबड्सचे फीचर्स, त्याची किंमत याविषयी जाणून घेणार आहोत.

OnePlus Nord Buds 2 चे फीचर्स

OnePlus च्या इअरबड्समध्ये १२.४ mm मध्ये डायनॅमिक ड्रायव्हर देण्यात आला आहे. तसेच यामध्ये BassWave चा सपोर्ट देखील देण्यात आला आहे. बास टोनसाठी यामध्ये back cavity चा पर्याय देण्यात आला आहे. यामध्ये नॉइज कॅन्सलेशन आणि पारदर्शकता मोड देखील आहे. OnePlus Nord Buds 2 ला ऑडिओ कोडिंग म्हणून AAC चा सपोर्ट आहे.

shoe sizing system in india
भारतात येणार नवीन ‘शू सायझिंग सिस्टिम’, ‘भा’ म्हणजे काय आणि त्याची गरज का आहे?
Samsung launched on Friday a new variant of its popular budget F15 smartphone Here is all the details
२० हजारांपेक्षा कमी किमतीत सॅमसंगचा ट्रिपल कॅमेरा सेटअपचा स्मार्टफोन; बॅटरी लाईफ बघून म्हणाल ‘डील Done’
nashik, malegaon, clerk arrested, ration office, Accepting Bribe, Register Needy Families, Welfare Schemes, malegaon bribe case,
नाशिक : लाच स्वीकारताना कारकुनास अटक
us ambassador to india
“भविष्य घडवायचं असेल, तर भारतात या”; अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी यांच्याकडून भारताचं कौतुक

हेही वाचा : PhonePe ने लॉन्च केले Pincode App; शेजारच्या दुकानातूनही ऑनलाईन मागवता येणार ‘हे’ सामान

OnePlus Nord Buds मध्ये डॉल्बी अ‍ॅटमॉस मोबाईल व्हर्जन अणि Dirac ऑडियो ट्यूनर देखील येतो. याशिवाय यामध्ये Active नॉइज कॅन्सलेशन असून जे २५ dB पर्यंत नॉइज कॅन्सलेशनचा दावा करते. या इअरबड्समध्ये ड्युअल कोअर प्रोसेसरर वापरण्यात आला आहे.वनप्लसच्या या इअरबड्समध्ये ड्युअल माईक सिस्टीम देण्यात आली आहे. यामध्ये तुम्हाला Dolby सह बॅलन्स्ड सेरेनड, बोल्ड आणि बास मोडस मिळणार आहेत. या इअरबड्सचे चार्जिंग फास्ट मोडमध्ये होते. म्हणुजे जर का तुम्ही हे इअरबड्स १० मिनिटे चार्ज केले तर हे ५ तासांचा बॅकअप देते असा कंपनीचा दावा आहे.

इअरबड्स चार्जिंग केससह चार्ज केले असता त्याचे बॅटरीचे लाईफ हे २७ तासांचे आहे. OnePlus Nord Buds OnePlus फास्ट पेअर आणि IP55 रेटिंगसह येतो. प्रत्येक बड्सचे वजन हे ४.७ ग्रॅमचे आहे. चार्जिंग केसचे वजन ३७.५ ग्राम इतके आहे. या इअरबड्सना HeyMelody App चा देखील सपोर्ट तुम्हाला मिळणार आहे.

हेही वाचा : IMM च्या विद्यार्थीनीची कौतुकास्पद कामगिरी, मायक्रोसॉफ्ट मध्ये मिळालं तब्बल ‘इतक्या’ लाखांचं पॅकेज

काय असणार किंमत ?

वनप्लसने लॉन्च केलेल्या OnePlus Nord Buds 2 इअरबड्सची किंमत भारतामध्ये २,९९९ रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. हे इअरबड्स तुम्ही Lightning White आणि Thunder Grey या दोन रंगांमध्ये खरेदी करू शकणार आहात.