Oppo News: Oppo ही एक मोबाईल उत्पादक कंपनी आहे. ही कंपनी लवकरच Oppo Reno 8T सिरीज लाँच करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये Oppo Reno 8T 4Gआणि Oppo Reno 8T 5G यान मॉडेल्सचा समावेश असेल. मागील वर्षी चीनमध्ये ही सिरीज लाँच झाली होती. तसेच एका विश्वसनीय टिपस्टरने या सिरीजमधील स्मार्टफोन्सची किंमत आणि फीचर्स उघड केले आहेत. Oppo Reno 8T सिरीजचे फीचर्स या सिरीजमधील फोनमध्ये १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा येईल. त्यामध्ये मायक्रोलेन्स सेन्सर आहे. याचे डिझाईन ३डी आहे. यामध्ये ६७ वॅटचे फास्ट चार्जिंग होते. तसेच ६.६७ इंचाचा ओएलईडी डिस्प्ले या स्मार्टफोन्समध्ये येतो. हे स्मार्टफोन्स जानेवारी महिन्याच्या अखेरीस भारतीय बाजारपेठेत लाँच होण्याची शक्यता आहे. यावतिरिक्त ते फेब्रुवारी महिन्यात लाँच होऊ शकतात रसिक अहवालात म्हणण्यात आले आहे. हेही वाचा : Spotify Layoff: Spotify करणार पुन्हा कर्मचाऱ्यांची कपात, जाणून घ्या काय आहे प्रकरण ? काय असणार किंमत ? टिपस्टर मुकुल शर्मा यांच्या ट्विटनुसार Oppo Reno 8T सिरीजची किंमत २७,००० ते २९,००० रुपयांच्या दरम्यान असू शकते. यामध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज येऊ शकते. तसेच हे स्मार्टफोन मिडनाईट ब्लॅक, सनसेट ऑरेंज या रंगांमध्ये ग्राहकांसाठी उपल्बध असू शकतात.