How to upload Tiranga Selfie: भारताचा ७६ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी आपल्या सोशल मीडियावरील डीपी बदलण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरील स्वतःच्या फोटोच्या जागी तिरंगी झेंड्याचा फोटो लावला आहे. hargarhtiranga.com या वेबसाइटवर तिरंग्यासह फोटो अपलोड करण्यास सांगितले आहे. तुम्ही सर्वजण तुमचा सेल्फी या वेबसाइटवर अपलोड करू शकता. याबाबत पीएम मोदींनी एक ट्विटही केले आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, तिरंगा हा स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या “हर घर तिरंगा” आंदोलनात सहभागी व्हावे, असेही त्यांनी आवाहन केले आहे.

हर घर तिरंगा माहिम हा २०२२ साली स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सांस्कृतिक मंत्रालयाने सुरू केलेला एक उपक्रम आहे. मंत्रालयाने एक वेबसाइट देखील सुरू केली जी लोकांना त्यांचे सेल्फी अपलोड करण्यास अनुमती देते. वेबसाइटवर आतापर्यंत ७० लाखांहून अधिक लोकांनी त्यांचे सेल्फी अपलोड केले आहेत.

job application from blinkit viral photo
पट्ठ्याने Blinkit चा वापर चक्क नोकरी मिळवण्यासाठी केला! सोशल मीडियावर ‘हा’ Photo होतोय व्हायरल…
Wasim Akram Reacts On Hardik- Rohit Controversy
हार्दिक पंड्याच्या मुलाचा उल्लेख करत वसीम अक्रमने हार्दिक- रोहितबाबत वादावर मांडलं मत; म्हणाला, “२० वर्षांपूर्वी..”
boys did dangerous stunt with car to make reels video went viral on social media
रिल्ससाठी जीवघेणा स्टंट! मित्राला प्लास्टिकच्या रॅपरमध्ये गुंडाळले अन् चालत्या कारच्या बाहेर…
Funny Answer Sheets Viral
वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांने सांगितला नवा उपाय; व्हायरल उत्तरपत्रिका वाचून तुम्हीही लावाल डोक्याला हात

(हे ही वाचा : Tech Tips: तुमच्या मोबाइलची बॅटरी कशी सेव्ह करायची? ‘या’ आहेत सोप्या स्टेप्स )

तुमचा सेल्फी कसा अपलोड कराल?

  • सर्व प्रथम harghartiranga.com वर जा.
  • येथे तुम्हाला होमपेजवर अपलोड सेल्फी विथ फ्लॅगचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • आता एक पॉपअप तुम्हाला दाखवेल. त्यावर तुमचे नाव लिहा आणि सेल्फी अपलोड करा.

टीप, सेल्फी अपलोड करण्यासाठी तुम्हाला ‘hargartiranga.com’ वेबसाइटवर तुमचे नाव आणि फोटो वापरण्यासाठी तुमची संमती द्यावी लागेल. त्यानंतरच तुम्ही तुमचा सेल्फी सबमिट करू शकाल. सेल्फी सबमिट केल्यानंतर, नावाच्या मदतीने तुम्ही तुमचा सेल्फी वेबसाइटवर देखील शोधू शकता. जर काही कारणास्तव तुम्हाला सेल्फी दिसत नसेल तर तुम्हाला तो १६ ऑगस्टनंतर पाहता येणार आहे.