देशभरात होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. सणासुदीच्या निमित्ताने ग्राहक नवनवीन वस्तूंची खरेदी हमखास करतात. त्यामुळे २५ मार्चला असणाऱ्या होळी या सणानिमित्त बाजारात विविध रंग, पिचकारी, रंगीबेरंगी कपडे आदी गोष्टींनी दुकाने होळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सज्ज झाली आहेत. या पार्श्वभूमीवर होळी सणानिमित्त इलेक्‍ट्रॉनिक्‍स क्षेत्रातील भारतातील सर्वांत मोठा ब्रॅण्‍ड सॅमसंगनेही खास सेलची घोषणा केली आहे.

होळीच्या सणानिमित्त जर तुम्ही तुमच्या घरासाठी काही नवीन उपकरणे खरेदी करण्याचा विचार करीत असाल, तर सॅमसंग तुम्हाला या कामात मदत करू शकते. कारण- या सेलमध्ये ग्राहकांना गॅलॅक्‍सी स्‍मार्टफोन्‍स, लॅपटॉप्‍स, टॅबलेट्स, ॲक्‍सेसरीज, वेअरेबल्स, सॅमसंग टीव्‍ही व इतर डिजिटल अप्‍लायन्‍सेस अशा विविध सॅमसंग उत्‍पादनांवर बंपर ऑफर्स व कॅशबॅक्‍स मिळणार आहेत. या ऑफर्स Samsung.com, सॅमसंग शॉप ॲप आणि सॅमसंग एक्‍सक्‍लुसिव्‍ह स्‍टोअर्समध्‍ये उपलब्‍ध असतील. ग्राहकांना बँक डेबिट व क्रेडिट कार्ड्सवर २५ टक्‍क्‍यांची कॅशबॅक मिळणार आहे. सॅमसंगच्या कोणत्या प्रॉडक्ट्सवर किती टक्के सूट आहे? चला तर पाहू.

Realme P1 Realme P1 Pro martphones will be available for purchase with Bank offers discounts and more
50MP कॅमेरा अन् फास्ट चार्जिंग सपोर्ट; रिअलमीच्या ‘या’ बजेट फ्रेंडली फोनची आज पहिली विक्री, जाणून घ्या आकर्षक सवलती
Samsung launched on Friday a new variant of its popular budget F15 smartphone Here is all the details
२० हजारांपेक्षा कमी किमतीत सॅमसंगचा ट्रिपल कॅमेरा सेटअपचा स्मार्टफोन; बॅटरी लाईफ बघून म्हणाल ‘डील Done’
Airtel Xtreme
लाईट्स, कॅमेरा, XStream : तुमचं वन स्टॉप एन्टरटेन्मेंट हब
This Bhopal-based startup has impressed Anand Mahindra with its driverless car using Bolero model
बोलेरो मॉडेलचा वापर करून तयार केली Driverless Car ! भोपाळच्या स्टार्टअपवर आनंद महिंद्रा झाले खुश!

सॅमसंगचा हा खास सेल काल १५ मार्चपासून सुरू झाला असून, याची अंतिम तारीख २६ मार्च असणार आहे. या होळी सेलदरम्‍यान गॅलॅक्सी स्मार्टफोनच्या गॅलॅक्‍सी एस, गॅलॅक्‍सी ए व गॅलॅक्‍सी झेड या सीरिजच्या फ्लॅगशिप मॉडेल्‍सवर जवळपास ६० टक्के इतकी सवलत मिळणार आहे.

गॅलॅक्‍सी बुक४ ३६०, गॅलॅक्‍सी बुक४ प्रो, गॅलॅक्‍सी बुक४ प्रो ३६०, गॅलॅक्‍सी बुक गो, गॅलॅक्‍सी बुक३ अल्‍ट्रा व गॅलॅक्‍सी बुक३ आदी अनेक गॅलॅक्‍सी लॅपटॉप्‍सच्‍या खरेदीवर ग्राहकांना जवळपास ४५ टक्‍के सूट देण्यात येणार आहे. तसेच गॅलॅक्‍सी टॅबलेट्स, वेअरेबल्‍स व ॲक्‍सेसरीजची निवडक मॉडेल्‍स खरेदी करणाऱ्या ग्राहकांना जवळपास ५५ टक्‍के सूट देण्यात येणार आहे.

सॅमसंग टेलिव्हिजन्‍सचे प्रीमियम व काही लाइफस्‍टाईल मॉडेल्‍स खरेदीसाठी इच्छुक ग्राहक १५,२५० रुपयांच्‍या अतिरिक्‍त एक्‍स्चेंज ऑफर्ससह जवळपास ४८ टक्‍के सवलतीचा आनंद घेऊ शकतात.

हेही वाचा…७० टक्के वीज बचत करून खर्च वाचवते ‘ही’ AI वॉशिंग मशीन; कपडे धुण्याचा वेळही होईल अर्धा, पाहा फीचर्स व किंमत

सेलदरम्‍यान रेफ्रिजरेटर्स किंवा आणखीन सॅमसंगचे डिजिटल अप्‍लायन्‍सेस खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ४९ टक्‍के सूट आणि जवळपास १५,१२५ रुपयांचे फायदे एक्‍स्‍चेंज स्वरूपात मिळू शकतात. सॅमसंग विंडफ्रीTM एसीच्या काही निवडक मॉडेल्‍सवर ३९ टक्‍क्‍यांपर्यंत ग्राहकांना सूट, दोन किंवा अधिक एसी खरेदी केल्यानंतर अतिरिक्‍त पाच टक्‍के सूट आणि फेस्टिव्‍ह सेल ऑफरअंतर्गत ग्राहकांना १४१५ रुपयांचे मोफत इन्‍स्टॉलेशनसुद्धा करून देण्यात येणार आहे .

फुली ऑटोमॅटिक वॉशिंग मशिन्‍स इकोबबलTM खरेदी करणाऱ्या ग्राहकांना जवळपास ५० टक्‍के सवलतीसह १५,१२५ रुपयांची एक्‍स्‍चेंज ऑफर; तर निओ क्‍यूएलईडीचे निवडक मॉडेल्‍स खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ५० इंच सेरिफ टेलिव्हिजनसुद्धा स्‍पेशल गिफ्ट म्हणून देण्यात येणार आहे.

२८ लिटर स्लिमफ्राय मायक्रोवेव्‍ह आणि ३२ लिटर वाय-फाय एनेबल बीस्‍पोक मायक्रोवेव्‍ह अशा मायक्रोवेव्‍हजच्या खरेदीवर ग्राहकांना जवळपास ४५ टक्‍के सूट देण्यात येणार आहे. स्‍मार्ट मॉनिटर्स आणि गेमिंग मॉनिटर्सच्‍या खरेदीवर ग्राहक जवळपास ५९ टक्‍के सूट, जवळपास २० टक्‍के बँक कॅशबॅक व जवळपास ३००० रुपयांची ‘कार्ड’ सूट मिळवू शकतात. तेव्हा होळीनिमित्त तुम्हीसुद्धा सॅमसंगच्या या सेलमध्ये तुमच्या आवडत्या गोष्टी खरेदी करण्याचा आनंद लुटू शकता.