सॅमसंग या भारतातील सर्वांत मोठ्या इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रॅण्‍डने स्मार्टफोनच्या नवीन ‘ए’ (A) सीरिजची घोषणा केली आहे. गॅलॅक्‍सी ‘A’ सीरिज दोन वर्षांपासून भारतात सर्वाधिक विक्री होणारी स्‍मार्टफोन सीरिज आहे. त्यामुळे काल कंपनीने नवीन ‘ए’ (A) सीरिज लाँच केली आहे. गॅलॅक्‍सी ए५५ ५जी व गॅलॅक्‍सी ए३५ ५जी, असे या नवीन सीरिजचे नाव आहे. नवीन ए सीरिज डिव्हायसेसमध्‍ये अनेक फ्लॅगशिप स्मार्टफोनसारखी फीचर्स आहेत. त्यामध्ये गोरिला ग्‍लास विक्‍टस प्लस प्रोटेक्‍शन, एआय कॅमेरा, टेम्‍पर-रेसिस्‍टंट, सिक्‍युरिटी सोल्‍युशन सॅमसंग नॉक्‍स वॉल्‍ट, तसेच इतर अनेक नवीन फीचर्सचा समावेश आहे.

पहिल्‍यांदाच गॅलॅक्‍सी ए५५ ५जी मध्‍ये मेटल फ्रेम आणि गॅलॅक्‍सी ए३५ ५जी मध्‍ये मागील बाजूस प्रीमियम ग्‍लास देण्यात आली आहे. ऑसम लिलॅक, ऑसम आइस ब्‍ल्‍यू व ऑसम नेव्‍ही या तीन आकर्षक रंगांमध्‍ये उपलब्‍ध असलेले हे स्‍मार्टफोन्‍स आयपी६७ प्रमाणित आहेत. म्‍हणजेच हे डिव्हाइस धूळ व पाण्यापासून स्मार्टफोनचे संरक्षण तर करतेच; शिवाय एक मीटर फ्रेश वॉटरमध्‍ये जवळपास ३० मिनिटे टिकून राहू शकते.

Mumbai, GQG Partners, National Pension System Trust, SBI Life Insurance, Ambuja Cement, Adani Group, stake sale, investment, infrastructure, market capitalization,
‘जीक्यूजी पार्टनर्स’सह इतर गुंतवणूकदारांकडून अंबुजा सिमेंटची ४,२५१ कोटी रुपयांची हिस्सा खरेदी
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Connecting trust, suicide, suicide idea,
टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी…
Job Opportunities Opportunities through Staff Selection Commission
नोकरीची संधी:स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत संधी
opportunities in institute of banking personnel selection
नोकरीची संधी : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनमधील संधी
IPO of Forcas Studio Limited from August 19
फोर्कास स्टुडिओ लिमिटेडचा १९ ऑगस्टपासून ‘आयपीओ’
Job Opportunity Recruitment through Staff Selection Commission
नोकरीची संधी: स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे भरती
Startups like Ola Electric Mobility FirstCry and Unicommerce which sold shares responded to the IPO
दमदार बाजार पदार्पणाचे नवउद्यमींमध्ये नव्याने पर्व; ओला इलेक्ट्रिक, फर्स्टक्राय, युनिकॉमर्सची सूचिबद्धता फलदायी

कॅमेरा –

फोटो रिमास्‍टर, इमेज क्लिपर व ऑब्‍जेक्‍ट इरेझरसह स्‍मार्टफोन्‍समध्‍ये विविध नावीन्‍यपूर्ण एआय सुधारित कॅमेरा फीचर्स आहेत. गॅलॅक्‍सी ए५५ ५जी व ए३५ ५जी मध्‍ये ५० MP ट्रिपल कॅमेरासह एआय इमेज सिग्‍नल प्रोसेसिंग (आयएसपी)द्वारे सुधारित नाइटोग्राफी आहे. त्यामुळे ए सीरिजमध्‍ये अंधारात स्‍पष्‍ट व आकर्षक फोटो काढण्यास मदत मिळेल.

हेही वाचा…एअर जेश्चर सपोर्टसह भारतात येतोय रिअलमीचा ‘हा’ स्मार्टफोन; पाहा जबरदस्त फीचर्स

सॅमसंग नॉक्‍स वॉल्‍ट सिक्‍युरिटी पहिल्‍यांदाच ए-सीरिजमध्‍ये येते; ज्‍यामुळे फ्लॅगशिपस्‍तरीय सुरक्षितता अधिकाधिक युजर्सना उपलब्‍ध होईल. हार्डवेअरवर आधारित सिक्‍युरिटी सिस्‍टीम ही हार्डवेअर व सॉफ्टवेअर हॅक होण्यापासून संरक्षण करते. त्यामुळे डिव्हाइसमधील युजर्सच्या सर्वांत महत्त्वपूर्ण डेटासह, लॉक स्क्रीन क्रेडेन्शियल्‍स जसे पिन कोड्स, पासवर्डस् व पासवर्ड पॅटर्न्‍सचे संरक्षण होते.

स्‍मार्टफोन्‍सच्‍या पुढील व मागील बाजूस कॉर्निंग गोरिला ग्‍लास विक्‍टस + संरक्षणासह फ्लॅगशिपसारखा टिकाऊपणा, ६.६ इंच एफएचडी + सुपर एएमओएलईडी डिस्‍प्‍ले आणि किमान बेझल्‍ससह १२० हर्टझ रिफ्रेश रेट आहे. गॅलॅक्‍सी ए५५ ५जीला स्मार्टफोनला ४ एनएम प्रोसेस तंत्रज्ञानावर निर्माण करण्‍यात आलेले एक्झिनॉस १४८० प्रोसेसर पॉवर देते. तर गॅलॅक्‍सी ए३५ ५जी ५मध्ये एनएम प्रोसेस तंत्रज्ञानावर निर्माण करण्‍यात आलेल्‍या एक्झिनॉस १३८० प्रोसेसरसह अपग्रेड करण्‍यात आला आहे. हे पॉवर-पॅक स्‍मार्टफोन्‍स विविध एनपीयू, जीपीयू व सीपीयू अपग्रेड्ससह ७० टक्‍क्‍यांहून लार्ज कूलिंग चेंबर, गेम असो किंवा मल्‍टी-टास्‍क सुरळीत चालण्याची खात्री देतात.

सगळ्यात खास गोष्ट अशी की, गॅलॅक्‍सी ए५५ ५जी मध्‍ये१२ जीबी रॅम, गॅलॅक्‍सी ए५५ ५जी आणि गॅलॅक्‍सी ए३५ ५जी ग्राहकांना सॅमसंग वॉलेट मिळेल; जे मोबाइल वॉलेट सोल्‍युशन आहे आणि तुम्‍हाला गॅलॅक्‍सी डिव्हाइसमध्‍ये महत्त्वाच्‍या गोष्‍टी सोईस्‍कर व सुरक्षितपणे स्टोअर करण्यात मदत करतात. त्यामध्‍ये तुमचे पेमेंट कार्डस्, डिजिटल आयडी, प्रवास तिकिटे आदी गोष्टी स्टोअर करून ठेवू शकतात. या डिव्हाइसमध्‍ये अत्‍यंत लोकप्रिय व्हाइस फोकस फीचर आहे; जे वापरकर्त्‍यांना आजूबाजूचा आवाज कमी करून कॉल्‍स करण्याची व उचलण्याची परवानगी देते. तसेच गॅलॅक्‍सी ए५५ ५जी आणि गॅलॅक्‍सी ए३५ ५जीसह सॅमसंग ॲण्ड्रॉईड ओएसची जवळपास चार जनरेशन्‍स आणि पाच वर्षांचे सिक्‍युरिटी अपडेट्स देईल.

स्टोरेज, व्‍हेरिएण्‍ट्स आणि किंमत –

गॅलॅक्सी ए५५ ५जी – ८जीबी प्लस १२८ जीबी किंमत ३६,९९९ रुपये. या स्मार्टफोनमध्ये दोन व्हॅरिएंट्स असणार आहेत.

१. ८जीबी प्लस २५६ जीबी- ३९,९९९ रुपये.
२. १२जीबी प्लस २५६ जीबी- १२,९९९ रुपये.

गॅलॅक्सी ए ३५ ५जी – ८ जीबी प्लस १२८ जीबी – २७,९९९ रुपये. या स्मार्टफोनमध्ये एक व्हेरिएंट उपलब्ध आहे.

१. ८जीबी प्लस २५६ जीबी- ३०,९९९ रुपये.

ग्राहकांसाठी स्मार्टफोन खरेदी करताना एचडीएफसी, वन कार्ड, आयडीएफसी फर्स्‍ट बँक कार्ड्सवरील तीन हजार रुपयांच्‍या बँक कॅशबॅकसह सहा महिन्‍यांच्‍या नो कॉस्‍ट ईएमआय ऑप्‍शन्‍सचा समावेश आहे.

हेही वाचा…युजर्सची चिंता मिटली! आता स्टेटसवर एक मिनिटांचा VIDEO करता येणार शेअर; पाहा डिटेल्स

ग्राहकांसाठी इतर ऑफर्स –

१. सॅमसंग वॉलेट : पहिल्‍या यशस्वी टॅप ॲण्ड पे व्‍यवहारावर २५० रुपयांचे ॲमेझॉन व्हाऊचर.
२. यूट्यूब प्रीमियम : दोन महिने मोफत (१ एप्रिल २०२५ पर्यंत)
३. मायक्रोसॉफ्ट ३६५ : मायक्रोसॉफ्ट ३६५ बेसिक + सहा महिन्‍यांचे क्‍लाऊड स्‍टोरेज (जवळपास १०० जीबीपर्यंत, ऑफर रिडम्‍प्‍शन ३० जून २०२४ पर्यंत युजर्सना वापरता येऊ शकते.)

तसेच ग्राहकांना स्मार्टफोन खरेदी करताना एचडीएफसी, वन कार्ड, आयडीएफसी फर्स्ट बँक कार्ड्सवर तीन हजार रुपयांच्या बँक कॅशबॅकसह सहा महिन्यांचा नो कॉस्ट ईएमआय असे पर्यायही उपलब्ध आहेत. सॅमसंग फायनान्स प्लस आणि सर्व आघाडीच्या NBFC भागीदारांद्वारे ग्राहक Galaxy A55 5G फक्त १७९२ प्रतिमहिना आणि Galaxy A35 फक्त १७२३ दरमहा देऊन घेऊ शकतात. गॅलॅक्‍सी ए५५ ५जी आणि गॅलॅक्‍सी ए३५ ५जी खरेदीसाठी सॅमसंग एक्‍सक्‍लुसिव्‍ह व पार्टनर स्‍टोअर्स Samsung.com आणि इतर ऑनलाइन प्‍लॅटफॉर्म्‍सवर उपलब्‍ध आहेत. तर ग्राहकसुद्धा विविध फीचर्ससह हा स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहेत.