सध्या जगभरामध्ये अनेक दिग्गज टेक कंपन्या जागतिक आर्थिक मंदी मुळे आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहे. यामध्ये Twitter, Meta आणि Apple , Amazon, Microsoft and Google parent, Alphabet तसेच Meta कंपन्यांचा समावेश आहे. मेटा कंपनीमध्ये तर दुसऱ्यांदा कर्मचारी कपात होणार आहे. या दुसऱ्या फेरीत ११,००० कर्मचाऱ्यांना कमी करण्यात येणार आहे. आता यामध्ये टेक कंपन्यांतर टेलिकॉम कंपन्यांचा समावेश झाला आहे. टेलिकॉम कंपनी वोडाफोन कंपनीसुद्धा टाळेबंदी करणार आहे.

लोकप्रिय कंपनी वोडाफोन आपल्या १००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार आहे. १ हजार लोकांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवणे म्हणजे कंपनी आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी ५ टक्के कर्मचाऱ्यांना कमी करण्याच्या विचारामध्ये आहे. वोडाफोन कंपनीने ही माहिती रॉयटर्सशी शेअर केली आहे. कंपनीच्या दोन उच्च अधिकाऱ्यांनी रॉयटर्सला सांगितले की, ब्रिटिश टेलिकॉम कंपनीला आपल्या इटलीमधील युनिटची संख्या कमी करायची आहे. त्यासाठी कंपनीने मोठ्या प्रमाणावर खर्चात बचत करण्याचा निर्णय घेतला आहे.

Black market, pune RTO, brokers,
पुणे आरटीओत ‘काळाबाजार’! दलालांनी उभारली पर्यायी यंत्रणा; कर्मचाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार
sensex again at the level of 74 thousand print eco news
तेजीवाल्यांची पकड मजबूत; सेन्सेक्स पुन्हा ७४ हजारांच्या उंबरठ्यावर
India Wholesale Inflation Reaches 3 Month High
घाऊक महागाई दर मार्चमध्ये किंचित वाढून तिमाही उच्चांकावर
narendra modi sanjay singh
“तोट्यातल्या कंपन्यांकडून भाजपाला कोट्यवधींचं दान, काही कंपन्यांकडून नफ्याच्या ९३ पट देणग्या”, निवडणूक रोख्यांवरून आपचे गंभीर आरोप

हेही वाचा : Tech Layoffs: ‘Meta’ मध्ये दुसऱ्यांदा होणार तब्बल १० हजार कर्मचाऱ्यांची कपात; CEO म्हणाले, “आपल्या सर्वांना…”

वोडाफोन कंपनी इटलीमधील १००० कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार वोडाफोन इटालियाने एक निवेदन जाहीर केले आहे. त्यात कंपनीने म्हटले आहे की कंपनीकहा कमी झालेला फायदा आणि महसुलतील घट यामुळे वोडाफोन कंपनी टेलिकॉम क्षेत्रामध्ये प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या दबावाचा सामना करावा लागत आहे.

कंपनीच्या ताज्या वार्षिक अहवालानुसार मार्चपर्यंत वोडफोन इटालियामध्ये एकूण ५ हजार ६७५ कर्मचारी काम करत होते. २०२३ च्या सुरुवातीस,अनेक मीडिया रिपोर्ट्सद्वारे असे कळले होते की वोडाफोनने लंडनमधील अनेक कर्मचार्‍यांना pink स्लिप देखील जारी केल्या होत्या.