WhatsApp हे संवादासाठी सर्वात जास्त वापरले जाणारे माध्यम आहे. हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असून ते मेटाच्या मालकीचे आहे. यावरून तुम्ही एकमेकांशी संवाद साधू शकता. आपले फोटोज,व्हिडीओज शेअर करू शकता. व्हिडीओ कॉलद्वारे चॅट करू शकता. कंपनी आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन फीचर्स लॉन्च करते. जेणेकरून वापरकर्त्यांना व्हॉट्सअ‍ॅप वापरणे अधिक सोपे जावे. हे सर्वात जास्त लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. ज्याचे २ अब्जापेक्षा जास्त वापरकर्ते आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये मेटा मालकीच्या प्लॅटफॉर्मने अनेक लहान मोठे फीचर्स लॉन्च केले आहेत. आज आपण असाच ५ फीचर्सबद्दल जाणून घेणार आहोत.

HD फोटोज फिचर

व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन अपडेटकडे लक्ष ठेवणाऱ्या WABetaInfo च्या अहवालानुसार ‘HD फोटो ‘ हे फिचर आणले आहे. हे फिचर iOS आणि अँड्रॉइड या दोन्ही वापरकर्त्यांसाठी लॉन्च करण्यात आले आहे. याआधी फोटो पाठवताना त्याची साईझ किंवा क्वालिटी कंप्रेस होत असे. मात्र या फीचरच्या मदतीने तुम्ही पाठवलेले फोटो HD क्वालिटीमध्येच समोरच्याला दिसणार आहे. तसेच मेटा कंपनी देखील WhatsApp वर एचडी व्हिडीओ शेअरिंग फिचर आणण्यासाठी काम करत आहे.

How to restrict WhatsApp media downloads
‘गुड मॉर्निंग’च्या फोटोने गॅलरी फुल? WhatsApp सेटिंगमधील ‘हा’ एक बदल करील तुम्हाला मदत; पाहा टिप्स….
Porn Bots Pops Up On Screen Because You Engage With It Says Former Meta Employee
स्क्रोल करताना अचानक पॉर्नसारखे व्हिडीओ का दिसतात? मेटाच्या माजी सहसंस्थापकाच्या पोस्टमुळे नेटकरी भडकले
IPL 2024 Lucknow Super Giants vs Punjab Kings Match Updates in Marathi
IPL 2024 LSG vs PBKS: इम्पॅक्ट प्लेयरचा चतुराईने वापर, आता राहुलही इम्पॅक्ट प्लेयर
fake coca cola cold drinks making and packing video goes viral people got angry after watching
कोल्ड्रिंक्सच्या नावाखाली विकले जातेय विष? व्हायरल VIDEO मध्ये पाहा बनावट कोल्ड्रिंक्सचा काळाबाजार

हेही वाचा : आता WhatsApp वरून देखील सेंड करता येणार ‘HD’ क्वालिटीचे फोटोज, कंपनीने आणले ‘हे’ नवीन फिचर

इन्स्टंट व्हिडीओ मेसेज

WhatsApp ने एक नवीन फिचर लॉन्च केले आहे. जे वापरकर्त्यांना त्यांच्या चॅटमध्ये लहान आकाराचे व्हिडीओ मेसेज सेंड आणि रिसिव्ह करण्यास परवानगी देते. कंपनीने instant video हे फिचर लॉन्च केले आहे. हे इन्स्टंट व्हिडीओ मेसेज हे व्हॉइस मेसेजसारखेच असतात. व्हिडीओ मोडवर स्विच करण्यासाठी वापरकर्ते टेक्स्ट फिल्डच्या उजव्या बाजूला असलेल्या आयकॉनवर क्लिक करू शकतात. तसेच त्यानंतर ते ६० सेकंद इतक्या वेळेचा व्हिडीओ शेअर करू शकतात. वापरकर्ते व्हिडीओ लॉक करण्यासाठी आणि हॅन्ड्स फ्री रेकॉर्ड करण्यासाठी स्वाईप देखील करू शकतात. 

म्यूट अननोन फिचर

व्हॉट्सअ‍ॅपवर तुम्ही अनोळख नंबरवरून येत असलेल्या कॉल्सना कंटाळला आहात. मेटाच्या मालकीचे असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपने मेसेजिंग प्लॅटफॉर्मची सुरक्षा वाढवण्यासाठी अनोळखी नंबरवरून कॉल आल्यास ऑटोमॅटिकपणे म्यूट करण्याची परवानगी देते. अनोळखी व्यक्तींकडून अनोळखी ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल्सपासून दूर राहण्यासाठी वापरकर्ते आता म्यूट अननोन फिचर वापरू शकतात.

एडिट मेसेजेस

या फीचरमुळे यूजर्सना समोरच्या व्यक्तीला पाठवलेला मेसेज चॅटमधून १५ मिनिटांचा अवधी मिळणार आहे. याबाबतची माहिती काही महिन्यांपूर्वी समोर आली होती. नुकतंच या नव्या फीचरच्या लॉन्चची मेटा कंपनीने अधिकृत घोषणा करण्यात आली. यूजर्सना आता चॅटवर आधीपेक्षा जास्त नियंत्रण ठेवता येईल. या फीचरमुळे मेसेजमधील शब्दांमध्ये दुरुस्ती करणे किंवा त्याला अधिकचा संदर्भ जोडणे शक्य होणार आहे. एडिट फीचरसाठी आम्ही फार उत्सुक आहोत. मेसेज पाठवल्यानंतर १५ मिनिटांच्या आत यूजर्सना मेसेजमध्ये बदल करता येणार आहे. मेसेज टॅप करुन पुढे ‘एडिट’ पर्याय निवडल्यावर मेसेजमधील चुका सुधारता येणार आहेत, असे मेटा कंपनीने त्यांच्या ब्लॉगमध्ये नमूद केले आहे.

हेही वाचा : व्हॉट्सअ‍ॅपने Edit Message फीचर केले लॉन्च; मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुक पोस्टद्वारे केली घोषणा

चॅट लॉक

WaBetaInfo च्या एका रिपोर्टनुसार WhatsApp च्या काही बीटा वापरकर्ते आता नवीन चॅट लॉक या फीचरचा वापर करू शकणार आहेत. हे एक जबरदस्त फिचर आहे कारण या फीचरमुळेतुमचे चॅट लपवण्यासाठी आता तुम्हाला तुमचे whatsapp पूर्ण्पणे बंद करण्याची गरज नाही आहे. या उलट वापरकर्ते केवळ त्यांना जे चॅट्स लावपायचे आहेत तितकेच लपवू शकणार आहेत. वापरकर्त्यांच्या सुरक्षा लक्षात घेऊन असाही दावा करण्यात आला आहे की लॉक करण्यात आलेल्या चॅट्समधील फोटो किंवा व्हिडीओ फोनमधील गॅलरीमध्ये ऑटोमॅटिक डाउनलोड होणार नाहीत.