मोबाईल वर्ल्ड काँग्रेस म्हणजेच MWC 2023 हा या वर्षातील सर्वात मोठा मोबाईल शो आहे. २७ फेब्रुवारी ते २ मार्च या दरम्यान हा शो बार्सिलोनो येथे होत आहे. या शो मध्ये अनेक कंपन्यांनी आपले स्मार्टफोन्स आणि अनेक प्रॉडक्ट्स लॉन्च केली आहेत. या शो मध्ये Xiaomi ने आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन Leica लेन्ससह लॉन्च केला आहे. हा फोन शाओमीच्या या सिरीजमधील सर्वात खास फोन आहे. चिनी उत्पादक कंपनी असणाऱ्या या शाओमी कंपनीने या शो मध्ये आणखी एक प्रॉडक्ट लॉन्च केले आहे. शाओमीने Wireless AR Glass Discovery Edition नवीन फीचर्ससह लॉन्च केले आहेत.

वायरलेस एआर ग्लास डिस्कव्हरी एडिशन हे इतर वायरलेस एआर ग्लास पेक्षा फारसे वेगळे नसले तरीही यामध्ये हलके डिझाईन वापरण्यात आले आहे. या संपुन युनिटचे वजन हे फक्त १२६ ग्रॅम इतके आहे. यामध्ये मॅग्नेशियम-लिथियम मिश्र धातूची रचना देण्यात आली आहे. नावाप्रमाणेच Xiaomi Wireless AR Glass Discovery Edition मध्ये इन बिल्ट बॅटरी देण्यात आली आहे. यामध्ये वापरकर्त्यांना १२०० निट्स पर्यत ब्राईटनेस आणि ५८ PPD पिक्सेल प्रति डिग्री) सह दोन मायक्रो OLED स्क्रीन तसेच प्रत्येक डिस्प्ले मॉड्यूलवर एक फ्री फॉर्म लाइट-मार्गदर्शक प्रिझमचे फिचर देखील देण्यात आले आहे. एआर प्रॉडक्टवरील लेन्स इलेक्ट्रोक्रोमिक टेक्नॉलॉजीचा वापर करतात.

Unicorns List India ranks third
Unicorns List: अमेरिका व चीनपाठोपाठ भारत तिसऱ्या स्थानावर
Essel Propack Limited Attractive durable quality in packaging
वेष्टनांतील आकर्षक, टिकाऊ गुणवत्ता
ring of fire
विश्लेषण : भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे ‘रिंग ऑफ फायर’ नेमके कुठे आहे? या भागात सर्वाधिक भूकंप का होतात?
loksatta analysis midcap and smallcap stocks surged
विश्लेषण: सरत्या वर्षात शेअर बाजारात तेजीच तेजी… ‘स्मॉल कॅप’ ठरले छोटे उस्ताद! तेजीचे आणखी कोण भागीदार?

हेही वाचा : World’s Richest Person: पुन्हा एकदा Elon Musk चं नंबर वन! जगातील श्रीमंताच्या यादीत मिळवले पहिले स्थान, गौतम अदाणी ‘या’ स्थानावर

तसेच वापरकर्त्यानी AR चष्मा घातल्यावर वास्तविक जगाशी संवाद साधू शकतात जसे ते त्याच्या रेग्युलर सनग्लासेस करतात. AR ग्लासेस एकदा चालू केले की , चष्मा बाहेरील प्रकाश अडवून तुम्हाला एक चांगला AR अनुभव मिळवून देईल. बाहेरील उजेडानुसार वापरकर्त्यांकडे टिंटची तीव्रता नियंत्रित करण्याचा ऑप्शन देखील असणार आहे.

शाओमी कंपनीच्या मते वायरलेस एआर ग्लास डिस्कव्हरी एडिशन टिकटॉक आणि युट्यूब सारख्या अ‍ॅप्सना एआर ऑप्टिमायझेशनसह चालवू शकतात. हा एक वायरलेस एआर ग्लास असला तरी त्याला Xiaomi 13 किंवा स्नॅपड्रॅगन स्पेसेस तयार असलेल्या Android स्मार्टफोनसह कनेक्ट करणे आवश्यक आहे.