बजेट स्मार्टफोनच्या श्रेणीत अलिकडेच स्वाइप कंपनीने ‘स्वाइप कनेक्ट ५.०’ हा फॅब्लेट बाजारात आणला असून, आता त्यांनी कनेक्ट या आपल्या स्मार्टफोनच्या श्रृंखलेतील ‘कनेक्ट ४’ आणि ‘कनेक्ट ४ ई’ हे दोन स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. कनेक्ट या श्रृंखलेतील दहा स्मार्टफोन बाजारपेठेत उतरविण्याचे उद्दिष्ट ठेवलेल्या या कंपनीने ‘स्वाइप कनेक्ट ५.०’, ‘कनेक्ट ४’ आणि ‘कनेक्ट ४ई’ द्वारे तीन स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. ‘कनेक्ट ४’ आणि ‘कनेक्ट ४ ई’ हे दोन्ही फोन अॅण्ड्रॉइड प्रणालीवर चालत असून, यात अॅण्ड्रॉइड ४.२.२ जेलिबीन प्रणाली देण्यात आली आहे. १ गेगाहर्टस् ड्युअल कोर प्रोसेसर असलेल्या या फोनमध्ये १५०० एमएएच ची बॅटरी असून, अनुक्रमे ५१२ आणि २५६ एमबीचा रॅम असलेले हे फोन ड्युअल सीम आहेत.

‘कनेक्ट ४’ आणि ‘कनेक्ट ४ ई’ या दोन्ही स्मार्टफोनमध्ये अनेक चांगल्या सुविधा देण्यात आल्या असून, अशाच प्रकारच्या अन्य फोनच्या तुलनेत यांची कार्यक्षमता उत्कृष्ट आहे. ४ इंचाचे टचस्क्रिन असलेल्या या फोनमध्ये ओजीएस तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यातील स्वाइप ‘कनेक्ट ४’मध्ये मागील बाजूस ३.२ मेगापिक्सलचा आणि पुढील बाजूस ०.३ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. तर, ‘कनेक्ट ४ ई’मध्ये मागच्या बाजूस २ मेगापिक्सल, तर पुढच्या बाजूसर ०.३ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. एसडी कार्डद्वारे ३२ जीबीपर्यंत मेमरी वाढविण्याची सुविधा या दोन्ही स्मार्टफोनमध्ये देण्यात आली आहे, ज्याचा वापर करून वापरकर्ता त्याच्या आवडीची अनेक गाणी, व्हिडीओ आणि उपयुक्त अॅपस् साठवून ठेऊ शकतो. ‘कनेक्ट ४’मध्ये ४ जीबी, तर ‘कनेक्ट ४ ई’मध्ये ५१२ ची अंतर्गत मेमरी देण्यात आली आहे. ‘कनेक्ट ४’मध्ये कनेक्टिव्हिटीसाठी वायफाय, ३जी आणि ब्ल्युटूथ सारख्या सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. तर, ‘कनेक्ट ४ ई’मध्ये २जी, वायफाय आणि इडीजीईसारख्या सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. ‘कनेक्ट ४’ची किंमत ४४९०, तर ‘कनेक्ट ४ ई’ची किंमत ३७५० इतकी असून, या फोनसोबत कंपनीतर्फे स्क्रिन कव्हर आणि लेदर केस मोफत देण्यात येत आहे.

वैशिष्ट्ये

स्वाइप कनेक्ट ४

ऑपरेटिंग सिस्टम – अॅण्ड्रॉइड ४.२.२ जेलिबीन
प्रोसेसर – १ गेगाहर्टस् ड्युअल कोर
डिस्प्ले – ४” (ओजीएस)
बॅटरी – १५०० एमएएच
कॅमेरा – ३.२ एमपी मागील बाजूस आणि ०.३ पुढील बाजूस
ड्युअल सीम
रॅम – ५१२ एमबी
मेमरी – अंतर्गत ४ जीबी, बाह्य ३२ जीबी पर्यंत
कनेक्टिव्हिटी – वायफाय, ३ जी, ब्ल्युटूथ
किंमत – ४४९०

कनेक्ट ४ ई

ऑपरेटिंग सिस्टम – अॅण्ड्रॉइड ४.२.२ जेलिबीन
प्रोसेसर – १ गेगाहर्टस् ड्युअल कोर
डिस्प्ले – ४” (ओजीएस)
बॅटरी – १५०० एमएएच
कॅमेरी – २ एमपी मागील बाजूस आणि ०.३ पुढील बाजूस
रॅम – २५६ एमबी
ड्युअल सीम
मेमरी – ५१२ एमबी अंतर्गत आणि ३२ जीबी पर्यंत बाह्य
कनेक्टिव्हिटी – २जी, वायफाय, इडीजीई
किंमत – ३७५०