कम्प्युटर, मोबाइल किंवा तंत्रज्ञानाविषयी तुमच्या मनातील समस्या विचारण्यासाठी आम्हाला Lstechit@gmail.com यावर ई-मेल करा.
 ’मला पेन ड्राइव्ह आणि हार्ड डिस्क घ्यायची आहे. तर मी ती कोणत्या कंपनीची घेऊ. ई-शॉिपग केले तर वस्तू खरी आहे हे कसे ओळखायचे. याबद्दल मार्गदर्शन करा.
गौरव गोरे.
उत्तर : सध्या बाजारात विविध कंपन्यांचे पेन ड्राइव्ह उपलब्ध आहेत. यातील सनडिस्क, ट्रान्ससेण्ड, एचपी या कंपन्यांचे पेन ड्राइव्ह तुम्हाला चांगल्या प्रकारे वापरता येऊ शकतात. वॉरण्टी असलेला पेन ड्राइव्ह घेतला म्हणजे तुम्हाला सोयीचे होऊ शकते. हार्डडिस्कच्या बाबतीतही तेच पाहून घेणे गरजेचे आहे. ई-शॉिपगमध्ये तुम्हाला बऱ्याच सवलती मिळू शकतात. पेन ड्राइव्ह नवा कोरा आहे का हे तपासण्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. त्या खालीलप्रमाणे.
१. सर्वप्रथम betdownload.com/h2testw-961-download? या संकेतस्थळावरून एक झिप फाइल डाऊनलोड करून घ्या.
२. ती फाइल संगणकात डाऊनलोड झाल्यावर एक्स्ट्रॅक्ट करा.
३. त्याचा आयकॉन तुमच्या डेस्कटॉपवर तयार होईल. त्यावर डबल क्लिक करा.
४. तुम्हाचा पेन ड्राइव्ह फॉरमॅट करून संगणकाला जोडला आहे ना याची खात्री करा.
५. टूल ओपन झाल्यावर त्यामध्ये पेन ड्राइव्हचा पर्याय स्वीकारा.
६. त्यानंतर राइट+व्हेरिफाय हा पर्याय निवडा.
७. याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला निकाल येईल. जर काही त्रुटी नाही आल्या तर पेन ड्राइव्ह चांगला आहे असे समजा. जर एरर आला तर तो फेक असल्याचे समजा. या टूलच्या मदतीने तुम्ही मेमरी कार्डही फेक आहे की चांगले आहे हे तपासू शकतात.
मला वायबरविषयी माहिती हवी आहे.
संकेत महाजन
उत्तर- वायबर अ‍ॅप हे व्हॉट्स अपसारखेच आहे यात आपल्याला एका कोडद्वारे रजिस्टर करता येते आणि ते आपल्या फोनवर मेसेजद्वारे मिळते. फोनमधले कॉन्टॅक्ट्स स्वत: शोधून हे अ‍ॅप आपल्याला मित्र-परिवारांशी जोडते. हे अ‍ॅप तुमच्या फोनमधील अ‍ॅड्रेस बुकमधील अन्य कॉन्टॅक्ट्स आधीपासूनच वायबरवर जोडलेले आहेत का ते तपासून पाहते. या अ‍ॅपचे वैशिष्टय़ असे आहे की या अ‍ॅपद्वारे तुम्हाला इंटरनेटचा वापर करून फोन करता येतो आणि तो पण फ्री. यात ३जी आणि वायफायमध्ये सर्वात उत्तम वॉइस क्वालिटीमध्ये कॉल करता येतो.