विंडोज एक्सपी ही आपली सर्वाधिक यशस्वी कार्यप्रणाली (ऑपरेटिंग सिस्टीम) येत्या ८ एप्रिलपासून कालबाह्य करण्याचे मायक्रोसॉफ्टने जाहीर केले आहे. खरेतर मायक्रोसॉफ्टने ही घोषणा केल्याला जवळपास एक वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. ८ एप्रिलपासून ‘एक्स्पी’ला पुरवत असलेला सर्व आधार काढून घेणार असून त्याआधी वापरकर्त्यांनी नवीन ऑपरेटिंग सिस्टीम अवलंबावी, असे आवाहनही मायक्रोसॉफ्टने केले होते. मात्र, देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये अजूनही ‘एक्सपी’वरच काम चालत असल्याचे आढळून आले. या मुद्दय़ावर धोक्याचा इशारा देणारे पत्र भारतीय बँक संघटनेने (आयबीए) अलीकडेच सर्व बँकांना पाठवले होते. ‘एक्सपी’ न हटवल्यास बँकांना दररोज अकराशे कोटींचा फटका बसणार’ हे वृत्त समजताच अनेक जण नव्याने जागे झाले आहेत. ‘एक्सपी’ जाणार म्हणजे काय होणार, बँकांसारखा धोका अन्य कंपन्या आणि घरातील कम्प्युटरनाही आहे का, तो टाळण्यासाठी काय करायला हवं, ८ एप्रिलनंतरही एक्सपी सुरक्षितपणे चालवता येईल का, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा हा प्रयत्न :
विंडोज एक्सपीचा जन्म २००१चा. कॉम्प्युटर म्हणजे केवळ आकडेमोड, नोंदी, व्यवहार, हिशेब अशा सर्व रूक्ष गोष्टी करणारे रूक्ष उपकरण अशी धारणा असलेल्या त्या काळात विंडोज एक्सपीच्या आगमनाने संगणकाचा चेहरामोहराच बदलून टाकला. आकर्षक रंग, ड्रॉप श्ॉडो, व्हिज्युअल स्टाइल असे अनेक दृश्य आणि फास्ट यूजर स्विचिंग, जलद इंटरनेट एक्स्प्लोअरर असे अंतर्गत बदल असलेल्या एक्स्पीने गेली बारा वष्रे जगभरातील कॉम्प्युटरवर राज्य केले. एक्सपीनंतर विंडोज व्हिस्टा, विंडोज ७ आणि िवडोज ८ या तीन अधिक आकर्षक आणि कार्यक्षम ऑपरेटिंग सिस्टीम्स मायक्रोसॉफ्टने आणल्या. पण एक्सपीची जादू ओसरली नाही. अगदी २००९ पर्यंत ऑपरेटिंग सिस्टीमच्या बाजारात अव्वल क्रमांकावर असलेल्या एक्सपीचे आजही जवळपास २९ टक्के वापरकत्रे आहेत. विंडोज ७च्या खालोखाल सर्वाधिक वापरकत्रे असलेल्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये ‘एक्सपी’चा क्रमांक लागतो. पण या एक्सपीला आता निरोप द्यायची वेळ आली आहे. येत्या ८ एप्रिल २०१४ पासून एक्सपीला देत असलेले सर्व सपोर्ट आणि तंत्रसाहाय्य बंद करण्याची घोषणा मायक्रोसॉफ्टने केली आहे. याचाच दुसरा अर्थ म्हणजे ‘एक्सपी’ आता ‘पोरके’ होणार आहे. हे पोरकंपण ८ एप्रिलनंतरही ‘एक्सपी’ वापरणाऱ्यांना चांगलंच महागात पडू शकतं.
नेमकं काय होणार?
‘एक्सपी’ २००१ मध्ये अस्तित्वात आल्यापासून आजवर मायक्रोसॉफ्टने त्यातील ‘बग’ हटवण्यासाठी तसेच नवीन वैशिष्टय़ांचा समावेश करण्यासाठी तीन ‘सर्व्हिस पॅक’ पुरवले. याशिवाय एक्सपीशी संबंधित अपडेट्स, सपोर्ट, पॅचेस वापरकर्त्यांना वेळोवेळी पुरवण्यात येत होते. हे सर्व येत्या ८ एप्रिलपासून बंद करण्यात येणार आहे.
ऑपरेटिंग सिस्टीमशी संबंधित सर्व सुरक्षा साहाय्यही बंद करण्यात येईल. याशिवाय एप्रिलनंतर येणारे नवे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर ‘एक्सपी’शी संलग्न नसतील.
‘सपोर्ट’ काढण्याचे कारण
मायक्रोसॉफ्टने ‘एक्सपी’ दाखल केल्यानंतर व्हिस्टा, विंडोज ७ आणि विंडोज ८ अशा तीन कार्यप्रणाली बाजारात दाखल केल्या. त्यापकी ‘व्हिस्टा’ सपशेल अपयशी ठरली. त्यामुळे एक्सपीच्या आधीच २००९ मध्ये ते कालबाह्य़ करण्यात आले. आता मायक्रोसॉफ्टने आपले सर्व लक्ष विंडोज ८ कडे वळवले आहे. सुरक्षितता आणि नवे तांत्रिक बदल याबाबतीत विंडोज ८ अधिक कार्यक्षम आहे. त्यामुळे ‘एक्सपी’साठी तांत्रिक साहाय्य पुरवण्यापेक्षा आपली कार्यक्षमता व शक्ती नवीन कार्यप्रणालीसाठी देण्याचे मायक्रोसॉफ्टने ठरवले आहे. त्यामुळे ‘एक्सपी’चा सपोर्ट काढण्यात येणार आहे.
पर्याय काय?
आपला कॉम्प्युटर व्हायरस किंवा हॅकर्सना बळी पडण्यापासून वाचवण्यासाठी ८ एप्रिलच्या आधी एक्सपी हटवून नवीन ऑपरेटिंग सिस्टीम चालू करणे हाच सर्वात चांगला व सुरक्षित पर्याय आहे. विंडोज ७ आणि विंडोज ८ हे दोनच पर्याय तुमच्यासमोर आहेत. मात्र, यापकी काहीही घेण्यापूर्वी तुमचा कॉम्प्युटर या ऑपरेटिंग सिस्टीमना अनुरूप आहे का याची खातरजमा करावी लागेल. या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टीम चालू करण्यासाठी कॉम्प्युटरवर ज्या मुख्य गोष्टींची गरज असते त्या पुढीलप्रमाणे :
‘विंडोज सात’ किंवा आठसाठी आवश्यकता
*एक गिगाहर्ट्झ किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेचा ३२ किंवा ६४ बिटचा प्रोसेसर
*३२ बिटसाठी एक जीबी आणि ६४ बिटसाठी दोन जीबीची रॅम
*हार्ड डिस्कवर ३२ बिटसाठी १६ जीबी व ६४ बिटसाठी २० जीबीची जागा.
*हऊऊट 1.0  किंवा त्यापेक्षा प्रगत ड्रायव्हर असलेले डायरेक्ट-एक्स ९ ग्राफिक्स डिव्हाइस
*याशिवाय काही विशिष्ट सॉफ्टवेअर्ससाठी इतरही काही गोष्टी आवश्यक आहेत. त्यांची माहिती पाहण्यासाठी <http://windows.microsoft.com/en-us/windows/home>  या लिंकला भेट द्या.
*या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टीम्स तुमच्या कॉम्प्युटरवर चालू शकतात की नाही हे तपासायचे असल्यास तुम्ही िवडोज अपग्रेड असिस्टंटही डाऊनलोड करून त्याद्वारे तपासणी करू शकता. हे सॉफ्टवेअर तुम्हाला मायक्रोसॉफ्टच्या वेबसाइटवरून मिळेल.
‘एक्सपी’च हवाच असेल तर
िवडोज सात किंवा आठ खरेदी करण्याचा पर्याय सर्वात योग्य पर्याय असला तरी तो खर्चीकही आहे. तुमच्या कॉम्प्युटरची क्षमता नवी ऑपरेटिंग सिस्टीमला पात्र नसेल किंवा तुमच्या कॉम्प्युटरवरील काही महत्त्वाचे सॉफ्टवेअर केवळ एक्सपीवर चालणारेच असतील, तर तुम्हाला एक्सपी चालूच ठेवावा लागेल. असे असेल तर या एक्सपीचा वापर मर्यादित ठेवा. तो इंटरनेटशी न जोडता आणि केवळ ठरावीक (एक्सपीवर चालणाऱ्या) प्रोग्रॅमपुरताच त्याचा वापर करा. तुमच्या अन्य कामांसाठी तुम्हाला नवीन संगणक खरेदी करावा लागेल.(हा पर्याय जास्त खर्चीक आहे)
’ सर्वोत्तम अँटिव्हायरस वापरा : एक्सपी हटवणे शक्य नसेल तर तुमच्या संगणकाची सुरक्षा चोख करण्यासाठी जे जे करता येईल, ते तुम्हाला करावे लागेल. सर्वात प्रथम कोणतेही मोफत वा साधे अँटिव्हायरस सॉफ्टवेअर काढून सर्वोत्तम सुरक्षा असलेले अँटिव्हायरस इन्स्टॉल करा. कॅस्परस्की, मॅककॅफे यांसारख्या अँटिव्हायरसमध्ये दोन्ही बाजूने सुरक्षाचाळणी उपलब्ध असते. मात्र एवढय़ावरच समाधानी होऊ नका. ‘मॅलवेअरबाइट्स अँटिमॅलवेअर’सारखे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून आठवडय़ातून एकदा तरी संगणकात मॅलवेअर व्हायरस शिरला आहे का, याची खातरजमा करा.
’ फायरफॉक्स किंवा क्रोम वापरा : एक्सपीसोबतच इंटरनेट एक्स्प्लोअरर ६चाही शेवट होणार आहे. मात्र, त्याचबरोबर तुमच्या एक्सपीमध्ये मायक्रोसॉफ्टचा कोणताही इंटरनेट एक्स्प्लोअरर असेल तर तोही आठ एप्रिलनंतर सुरक्षेच्या दृष्टीने निकामी होईल. त्यामुळे इंटरनेट वापरण्यासाठी मोझिला फायरफॉक्स किंवा गुगल क्रोमचा वापर करा. त्याच वेळी या ब्राउजर्समधून येणाऱ्या मॅलवेअरवरही लक्ष ठेवा. अनेक मॅलवेअर ‘स्क्रिप्ट्स’च्या रूपात येतात. त्यांना रोखण्यासाठी इंटरनेटच्या सेटिंग अतिसुरक्षित ठेवा. याखेरीज तुम्हाला फायरफॉक्ससाठी  NoScript Security Suite <https://addons.mozilla.org/en-US/firefox/addon/noscript/>  आणि क्रोमसाठी NotScripts <https://chrome.google.com/webstore/detail/notscripts/odjhifogjcknibkahlpidmdajjpkkcfn&gt; या सॉफ्टवेअरचाही उपयोग होऊ शकतो.
*हे सर्व तात्पुरतेच : तुम्ही तुमचा एक्सपी कायम ठेवण्यासाठी वरील सर्व बदल केले तरीही तुमच्या कम्प्युटरचा धोका कमी होत नाही. त्यामुळे हे सर्व उपाय तातडीने एक्सपी बदलायला लागू नये, याकरिताच आहेत. कालांतराने हे उपायही तोकडे पडतील. त्यामुळे नवीन ऑपरेटिंग सिस्टीमसाठी आíथक जुळवाजुळव करून ठेवा.
परिणाम काय?
*या सर्वामुळे ‘एक्सपी’ बंद पडणार नाही. ती काम करणे सुरूच ठेवेल. पण ती  आधारहीन होईल. त्यामुळे व्हायरस, स्पायवेअर, मालवेअर अशा कॉम्प्युटरला धोकादायक ठरणाऱ्या सर्व गोष्टींना सिस्टीममध्ये सहज शिरकाव करता येईल. त्यामुळे ८ एप्रिलनंतर काही दिवसांतच तुमचा कॉम्प्युटरच निकामी होण्याची भीती आहे.
*नवीन सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअरनी ‘एक्सपी’शी संलग्नता नाकारल्यास या गोष्टी आपल्या कॉम्प्युटरवर इन्स्टॉल करणे शक्य होणार नाही.
*इंटरनेट एक्स्प्लोअरर, आउटलूक एक्स्प्रेस या गोष्टी बंद पडतील वा चालू राहिल्या तरी सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरतील.
*सर्वात मोठा धोका म्हणजे, सायबर गुन्हेगार आणि हॅकर्सना तुमच्या ‘एक्सपी’मध्ये सहज घुसखोरी करता येईल. त्यामुळे तुमची आíथक, खासगी माहिती, डाटा यांची चोरी होण्याची शक्यता आहे.