उच्च शिक्षणासाठी परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाच्या घरात GRE, TOFEL, GMAT अशा परीक्षांबद्दल माहिती मिळवणे, पुस्तके गोळा करणे, मॉक टेस्ट, स्कोर इत्यादींविषयी चर्चा करणे हे अपरिहार्य असते. या सर्व परीक्षांची तयारी प्रत्येक इच्छुक अर्थातच पदवी परीक्षेच्या अभ्यासाच्या बरोबरीने करत असतो.
या तयारीचाच एक भाग म्हणून इंग्रजी शब्दसंग्रह आणि गणिती कौशल्य वाढवण्यासाठी उपयोगी अशा काही लिक्सबद्दल जाणून घेऊ. ज्यांचा उपयोग करून तुम्ही GRE, TOFEL, GMAT, SAT या परीक्षांची तयारी करू शकता.
या लिक्सवर इंग्रजी व्होकॅब्युलरी बिल्डर आणि इंग्रजी, गणित यांची फ्लॅश कार्डस येथे उपलब्ध आहेत. ही टूल्स विनामूल्य आहेत.
<https://gre.magoosh.com/builder/vocabulary&gt; या लिकवर GRE च्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या १००० हून अधिक शब्दांचे योग्य अर्थ निवडण्याचा सराव येथे करता येतो. यामध्ये काठिण्यपातळीनुसार शब्दांचे वर्गीकरण केले आहे. प्रत्येक शब्दाचा योग्य अर्थ निवडण्यासाठी चार पर्याय दिलेले आहेत. योग्य उत्तर निवडलेत, की तो शब्द तुम्ही आत्मसात केल्याचे दाखवले जाते. तसेच त्या शब्दाचा वाक्यात उपयोगही करून दाखवला जातो. त्यामुळे शब्दाचा अर्थ पक्का होतो.
परंतु जर निवडलेले उत्तर चुकलेले असल्यास तुम्हाला योग्य उत्तर सांगून नंतर त्या शब्दाचा वाक्यात उपयोग करून दाखवलेला असतो. त्या शब्दात प्रावीण्य मिळेपर्यंत तो शब्द तुम्हाला पुन:पुन्हा विचारला जातो. अशाच प्रकारे स्वत:च्या मूल्यमापनासाठी वेगवेगळ्या परीक्षांनुसार फ्लॅशकार्ड्स उपलब्ध आहेत. प्रत्येक परीक्षेसाठी वेगवेगळी फ्लॅशकार्ड्स उपलब्ध आहेत.
त्याच्या लिक्स खालीलप्रमाणे-
GRE साठी
<https://gre.magoosh.com/flashcards/vocabulary&gt;
<https://gre.magoosh.com/flashcards/math&gt;

TOEFL साठी
<https://toefl.magoosh.com/flashcards/vocabulary&gt;

GMAT साठी
<https://gmat.magoosh.com/flashcards&gt;

SAT साठी
<https://sat.magoosh.com/flashcards&gt;

टूल्सचा वापर करण्यासाठी अकाऊंट उघडणे बंधनकारक नाही. या साइटचे मोबाइल अ‍ॅप्लिकेशनदेखील उपलब्ध आहे. यांची मोबाइल अ‍ॅॅप्लिकेशन तुम्ही गुगल प्ले किंवा अ‍ॅप स्टोअरवरून डाऊनलोड करून घेऊ शकता. सरावासाठी जर तुम्ही मोबाइल आणि कॉम्प्युटर या दोन्हीचाही उपयोग करणार असाल, तर तुमचा स्कोअर आणि पूर्ण केलेल्या लेव्हल्सचा रेकॉर्ड ठेवण्यासाठी येथे अकाऊंट उघडणे उपयोगाचे ठरू शकते.
<http://magoosh.com/>  या मुख्य साइटवर उपलब्ध असलेल्या व्हिडीओ लेक्चर्स, सराव प्रश्न, सराव परीक्षा या सर्व गोष्टींचा अ‍ॅक्सेस तुम्हाला पसे भरून मिळवता येतो. याची उपयुक्तता अजमावून बघण्यासाठी प्रथम सात दिवस तुम्ही हे विनामूल्य वापरून बघू शकता.
ही साइट परदेशात शिकायला जाण्याची इच्छा असलेल्यांसाठी जितकी उपयोगी आहे तशीच ती ज्यांना आपले ज्ञान तपासून बघायची इच्छा आहे अशा सर्वासाठीही उपयोगी आहे.
– मनाली रानडे
manaliranade84@gmail.com