माझा पेन ड्राइव्ह हा राइट टू प्रोटेक्ट झाला आहे. तो मी कसा फॉरमॅट करू? – संदेश वाणी

’ काही मेमरी कार्ड किंवा पेन ड्राइव्हमध्ये राइट टू प्रोटेक्ट हा पर्याय असतो. यामुळे तुम्ही तुमची माहिती सुरक्षित ठेवू शकता, पण यामुळे पेन ड्राइव्हच्या वापरावर अनेक मर्यादा येतात. यामुळे राइट टू प्रोटेक्ट काढून टाकणे आवश्यक असते. यासाठी काही पद्धती आहेत. यामध्ये एक म्हणजे तुम्ही विंडोज एक्सपी किंवा त्याच्या वरचे व्हर्जन वापर असाल तर Regedit.exe चा वापर करून तुम्ही प्रोटेक्शन काढू शकता. यासाठी तुम्ही Computer\HKEY_LOCAL_MACHINEYSTEM\  मध्ये जा. त्यानंतर CurrentControlSetontroltorageDevicePolicies मध्ये जा. तिथे तुम्हाला राइट टू प्रोटेक्ट नावाची फाइल दिसेल. यावर डबल क्लिक करा. मग तुम्हाला Regedit.exe ची विंडो ओपन झालेली दिसेल. यातील व्ह्य़ॅल्यू डेटामध्ये १ च्या ऐवजी ० करा. मग ओके बटणवर क्लिक करा. यानंतर तुमचा संगणक रिस्टार्ट करा. आता तुम्ही तुमचा पेन ड्राइव्ह फॉरमॅट करू शकता. जर तुम्हाला स्टोरेज डिव्हाइस पॉलिसीज नाही मिळाल्या, तर Computer\HKEY_LOCAL_MACHINEYSTEM\ मध्ये राइट क्लिक करा, तिथे तुम्हाला की नावाचा पर्याय दिसेल, त्यावर तुम्ही क्लिक करा. मग तुम्ही त्याची व्हॅल्यू बदलू शकता.

 

  • मला मोबाइलवरील काही गेम्स किंवा व्हॉट्सअ‍ॅपसारखे अ‍ॅप्स संगणकावर वापरायचे आहेत. तर त्याला काही पर्याय आहे का?

– अवधूत परब

अँड्रॉइड ही सर्वाधिक वापरली जाणारी मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम आहे. यामध्ये आपण अनेक गेम्स डाऊनलोड करतो. अनेकदा घरी असताना आपल्याला हे गेम्स संगणकावर असावेत असे वाटते. अशा वेळी तुम्ही मोबाइलमधील सबवे सर्फर किंवा अन्य गेम्स संगणकावर खेळू शकता. यासाठी तुम्हाला ब्ल्यूस्टक्स हे सॉफ्टवेअर तुमच्या संगणकात डाऊनलोड करून घ्यावे लागेल. हे सॉफ्टवेअर डाऊनलोड झाल्यावर ते संगणकात इंस्टॉल करा. त्यानंतर सॉफ्टवेअर सेटिंग अप होईल. हे झाल्यावर तुम्हाला माय अ‍ॅप्स, टॉप चॅट्स असे पर्याय दिसतील. यातील माय अ‍ॅप्स पर्याय निवडा. यानंतर एक वन टाइम सेट अप येईल. हा सेट अप आल्यावर तुम्हाला तुमचे गुगलचे लॉगइन करावे लागेल. हे लॉगइन झाल्यानंतर तुम्ही तुम्हाला पाहिजे ते अ‍ॅप्स सर्च करून इंस्टॉल करू शकता. यानंतर तुम्ही त्या इंस्टॉल अ‍ॅपच्या माध्यमातून गेम्स खेळू शकता. यामध्ये तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपही वापरू शकता.