गैरसोयीच्या ठिकाणी स्थलांतर; वाहतूक कोंडीचाही फटका
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील महापालिकेच्या विभागीय कार्यालयात असलेल्या आचार्य अत्रे ग्रंथालयाचे स्थलांतर करण्यात आले. यामुळे वाचकांना नवीन ग्रंथालयाच्या वास्तूत येताना वळसा घ्यावा लागतोच, शिवाय वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे या प्रसिद्ध अशा ग्रंथालय, वाचनालयातील वाचक संख्या रोडावत चालली आहे.
टिळक रस्त्यावरील महापालिकेच्या ग्रंथालयाची इमारत धोकादायक झाली होती. त्यामुळे हे वाचनालय डोंबिवली पूर्व भागातील सुनीलनगर भागात स्थलांतरित करण्याचा घाट घालण्यात आला होता. डोंबिवलीतील सुजाण वाचकांनी या स्थलांतराला कडाडून विरोध केला होता. डोंबिवलीच्या एका टोकाला असलेल्या या ग्रंथालयात कोण जाणार? असे प्रश्न ग्रंथालय सदस्यांकडून करण्यात येत होते. ‘लोकसत्ता ठाणे’ने वाचकांची बाजू घेऊन कोणत्याही परिस्थितीत हे ग्रंथालय अन्य भागात स्थलांतरित करू नये, अशी भूमिका घेतली होती. यामुळे महापालिकेने डोंबिवलीतील विभागीय कार्यालयाच्या तळमजल्याला हे ग्रंथालय सुरू केले.
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळ, बसथांब्याजवळ, वाहने उभी करण्यास जागा असल्याने ग्रंथालय सदस्य, वाचकांना नियमित या ग्रंथालयात येणे परवडत होते. अनेकजण सकाळच्या वेळेत कार्यालयात जाताना ग्रंथालयात येऊन पुस्तक बदलणे, नवीन घेणे ही कामे करीत होते. या ग्रंथालयात वाचकांची सतत वर्दळ होती. एमआयडीसी, मानपाडा, टिळक रस्ता, मानपाडा, दत्तनगर, राजाजी रस्ता अशा भागातील वाचक सदस्यांना पालिकेतील वाचनालय मध्यवर्ती ठिकाण होते. बस, रिक्षा जवळच उपलब्ध असल्याने ज्येष्ठ नागरिक, वाचकांना वाचनालयात येणे अवघड वाटत नव्हते.

निवडणुकीच्या तोंडावर..
महापालिका निवडणुका तोंडावर येताच काही तरी नवीन करून दाखवले म्हणून घाईघाईने हे ग्रंथालय फडके क्रॉस रस्त्यावरील नवीन वास्तूत स्थलांतरित करण्यात आले आहे. हे वाचनालय नोकरदार, ज्येष्ठ नागरिकांना आडवळणाचे ठरू लागले आहे. रेल्वे, बस, रिक्षेने या ठिकाणी जाणे सोयीस्कर नाही, अशा तक्रारी आता पुढे येऊ लागल्या आहेत. फडके क्रॉस रस्त्यावर सकाळ, संध्याकाळ वाहतुकीची वर्दळ असते. या कोंडीतून वाट काढत आचार्य अत्रे वाचनालयात येणे ज्येष्ठ नागरिकांना अवघड होते. त्यामुळे नियमित ग्रंथालयात येणारे राजाजी रस्ता, सुनीलनगर, दत्तनगर, एमआयडीसी, डोंबिवली पश्चिमेतून अनेक वाचकांनी पाठ फिरविली आहे. ग्रंथालयातील वर्दळ कमी झाल्याचा अनुभव येत असल्याचे वाचनालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. काही वाचकांनीही आपण पालिकेच्या ग्रंथालयाचे सदस्यत्व रद्द केले आहे, असे सांगितले.

bmc, mumbai municipal corporation, Tree Lights, Citing Environmental Concerns, tree lights in mumbai, mumbai tree lights, bmc Orders Removal of Tree Lights, mumbai news, environment news, dangerous for insects, bmc news, marathi news,
झाडांवरील रोषणाई सात दिवसात हटवा, पालिका प्रशासनाचे विभाग कार्यालयाना आदेश
nashik, one man Arrested, Smuggling Liquor, Worth 66 Lakh, from Goa, smuggling Liquor from Goa, nashik Smuggling Liquor, nashik news, crime news,
मद्यसाठा तस्करीतील हस्तकास नाशिकमध्ये अटक
Marathi board mumbai
मराठी पाटी नसल्यास दुप्पट मालमत्ता कर, मुंबई महापालिकेचा निर्णय, १ मे पासून अंमलबजावणी
The district administration announced the list of campaign materials along with food items in the list fixed to account for Lok Sabha election expenses pune
जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात आणली ‘स्वस्ताई’; जाणून घ्या कशी?

रचना अयोग्य
नवीन वास्तूमधील वर्तमानपत्र वाचनालय पहिल्या माळ्यावर आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक, वृद्धांना पहिल्या माळ्यावर जाणे शक्य होत नाही. त्यामुळे वाचनालयातील हे नियमित वाचक येणे बंद झाले आहे. नवीन वास्तूमधील ग्रंथालय रचना सुयोग्य नसल्याने वाचकप्रेमी नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.