News Flash

अंबरनाथमध्ये सात वर्षांच्या मुलाची दगडाने ठेचून हत्या

बुवापाडा डोंगर परिसरात गुरुवारी सकाळी शिवम रजक या मुलाचा मृतदेह आढळला. शिवम बुधवारपासून बेपत्ता झाला होता.

बुवापाडा भागात राहणारा शिवम बुधवारी रात्री घरातील सामान आणण्यासाठी घराबाहेर गेला होता.

अंबरनाथमधील बुवापाडा डोंगर परिसरात सात वर्षांच्या मुलाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवम दिग्विजय रजक असे या मुलाचे नाव असून बुधवारी रात्री तो बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल झाली होती.

उल्हासनगर शहरातील ११ वर्षाच्या मुलाची गळा चिरून हत्या केल्याची घटना ताजी असतानाचा अंबरनाथमधील बुवापाडा परिसरातील सात वर्षांच्या शिवम रजक या मुलाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. बुवापाडा भागात राहणारा शिवम बुधवारी रात्री घरातील सामान आणण्यासाठी घराबाहेर गेला होता. मात्र बराच वेळ झाला तरी तो घरी परतला नाही. कुटुंबियांनी शोधाशोध केल्यानंतर अंबरनाथ पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली.

गुरूवारी सकाळी बुवापाड्याच्या खदानशेजारील डोंगराळ भागात तबेला मालकाला शिवमचा मृतदेह आढळला. पोलिसांनी संशयाच्या आधारे रजक कुटुंबियाच्या शेजारी राहणाऱ्या अर्जुनला चौकशीसाठी ताब्यात घेतले. अर्जुन हा उत्तरप्रदेशातील जौनपुरचा रहिवासी असून तो अंबरनाथमध्ये सुतारकाम करत होता. त्याने रजक यांच्या घरी खानावळ लावली होती. त्यामुळे त्याची घरी येजा होती. अर्जुनने शिवमच्या वडिलांना काही पैसे दिले होते, त्यातील मोठी रक्कम शिवमच्या वडिलांनी परत दिली होती. मात्र उर्वरित रकमेसाठी तगादा लावणाऱ्या अर्जुनने अनेकदा दारू पिऊन शिवमच्या घरी जाऊन भांडण केले होते. याच रागातून त्याने ही हत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2018 2:40 pm

Web Title: ambernath murder 7 year old brutally murdered probe begin
Next Stories
1 उत्सवातील दांडगाईला चाप
2 ठाण्याहून नवी मुंबईला जायचे कसे?
3 दोन तास उशिरा पोहचलेल्या महापौरांविरोधात घोषणाबाजी
Just Now!
X