देशभरातील ३७ नामांकित कलाकारांच्या कलांचे सादरीकरण
ठाणे कलादालनात देशभरातील ३७ नामांकित कलाकारांच्या कलांचे सामुहिक प्रदर्शन नुकतेच भरविण्यात आले होते. भारतातील आसाम, आनंद, बडोदा, भिलवारा, धनबाद, कलकत्ता, नडियाद, नाशिक, मुंबई, सुरत, ठाणे, उज्जन अशा विविध राज्यातील आणि शहरातील कलाकारांच्या कलांचा या प्रदर्शनात समावेश होता. ऐशाज्र्या कोनवर, अजित भांडेरी, अशोक खांत, अर्पण परमार, चंद्रकांत फडतरे, डॉ. परिधी काळे, डॉ. चंद्रा काळे, गोरखनाथ बैले, जयंता खान, जयश्री गोरडिया, कश्यप पारीख, महमुदा पेनवाल्ला, मेघा माने, नंदुभाई राठवा, नंदकिशोर शर्मा, नाताल्लिया बहुशेवीच, नटवरलाल तांडेल, निलेश भारती, निलेश वेडे, रफिक सिंधी, राजनंदिनी, राजीव सरकार, रमेश पाचपांडे, सयाराम वाघमारे, शांतही कासी, सुनील दर्जी, दीपश्री सकट, के.सी.लॉय, मोनाली गज्जर, पवन मेनन, संदेश राव, समीर दिक्षीत, शहाजी निकम, सुमन दाभोलकर, सुरेश आवारी, उमेश पाटील, विकेश भोईर या कलाकारांनी आपली कलांचे या प्रदर्शनात सादरीकरण केले.
वास्तववादी, पारंपारिक तसेच आधुनिक पद्धतीत रेखाटलेली चित्र प्रदर्शनाची वैशिष्टय़ ठरली. प्रदर्शनात चित्रांबरोबरच स्थानिक छायाचित्रकारांच्या छायाचित्रांचेही सादरीकरण करण्यात आले होते. यामध्ये नैसर्गिक सौंदर्य, काव्यात्मक आणि अंकांवर आधारित छायाचित्रांचा समावेश होता. प्रदर्शनात आपली कलाकृती सादर करणाऱ्या कलाकारांनी प्रदर्शन पाहायला आलेल्या प्रेक्षकांशी संवादही साधला.