21 September 2020

News Flash

भिवंडीत रिक्षाचालकांच्या मारहाणीत एसटी चालकाचा मृत्यू

गायकवाड यांनी रिक्षाचालकाला बाजूला हटण्यास सांगितले.

राजुरा इथे हरिनाम सप्ताह सुरु आहे. या सप्ताहामध्ये जेवणानंतर काही मुलांना मळमळ आणि उलटीचा त्रास होऊ लागला.

भिवंडी शहरात बुधवारी रात्री मारहाणीच्या घटनेत एका एसटीचालकाचा मृत्यू झाला. प्रभाकर गायकवाड असे या मृत एसटीचालकाचे नाव असून त्याला स्थानिक रिक्षाचालकांनी मारहाण केली होती. प्रवीण गायकवाड हे एसटी घेऊन डेपोत जात असताना डेपोच्या गेटवर एक रिक्षा उभी होती. त्यावेळी गायकवाड यांनी रिक्षाचालकाला बाजूला हटण्यास सांगितले. मात्र, यावरून रिक्षाचालकाने गायकवाड यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरूवात केली. या वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. यावेळी आजूबाजूला असलेल्या अन्य रिक्षाचलकांनीही प्रवीण गायकवाड यांना बेदम मारहाण केली. या सगळ्या घटनेनंतर प्रवीण गायकवाड तक्रार नोंदविण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले होते. त्यावेळी अचानक चक्कर येऊन ते खाली कोसळले. त्यानंतर गायकवाड यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ आज भिवंडीत बसचालकांनी बंद पुकारला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2017 9:29 am

Web Title: auto rickshaw drivers kill bus driver in bhiwandi maharashtra murder crime
Next Stories
1 भाजपमध्ये गुंडगर्दी कायम!
2 सेनेविरुद्धच्या प्रचारात राष्ट्रवादीचे ‘झुरळ’
3 निवडणूक कामांमुळे पालिकेच्या तिजोरीला ओेढ
Just Now!
X