कल्याण-डोंबिवली पालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक, माजी विरोधी पक्षनेते सचिन पोटे यांचे नगरसेवक पद पालिका प्रशासनाने बुधवारी रद्द केले.

बेकायदा बांधकामप्रकरणी पोटे हे दोषी असल्याचा अहवाल पालिका प्रशासनाने तयार केला होता. उच्च न्यायालयाने एका बेकायदा बांधकाम प्रकरणात पोटे यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचे आदेश पालिकेला दिले होते. पोटे यांनी नगरसेवक पद रद्द केल्याची कारवाई झाल्याची कबुली दिली. पालिका आयुक्त ई. रवींद्रन यांनी काही दिवसांपूर्वी बेकायदा बांधकामांशी संबंधित दोषी आढळलेल्या पाच नगरसेवकांना नगरसेवक पद रद्द का करू नये म्हणून नोटिसा पाठविल्या आहेत. यात पोटे यांचाही सहभाग होता. पोटे यांनी आपल्या प्रभागात एक बेकायदा बांधकाम केले आहे. दरम्यान, नगरसेवक पद रद्द केल्याप्रकरणी आपण शुक्रवारी न्यायालयात दाद मागणार आहोत. आपणावर करण्यात आलेली कारवाई ही राजकीय दबावातून करण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया सचिन पोटे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

.