News Flash

ठाण्याची वाहतूक व्यवस्था ‘डिजिटल’

ठाणे शहरात वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत.

स्पेनच्या कंपनीकडून ‘डिजिटल मॅपिंग प्रकल्प’ अहवाल महापालिकेला सादर

परदेशी वाहतूक व्यवस्थेच्या धर्तीवर ठाणे शहराची विस्कळीत वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी ठाणे महापालिकेतर्फे स्पेनच्या ‘डिजिटल मॅपिंग प्रकल्प’ राबविण्यात येणार आहे. वाहतूक व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल सुचवणारा प्रकल्प अहवाल स्पेनच्या कंपनीकडून ठाणे महापालिकेला मंगळवारी सादर करण्यात आला.  ठाणे महापालिका तसेच मेडय़ुला सॉफ्ट टेक्नोलॉजी आणि ट्रान्स्पोर्ट सिम्यूलेशन सिस्टीम या स्पेन येथील संस्थांच्या संयुक्त सहभागाने हा प्रकल्प आकारास येणार आहे.

ठाणे शहरात वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. नियोजन नसल्याने शहराच्या अनेक भागांत वाहतूक कोंडीचा त्रास वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही सहन करावा लागत आहे. ही वाहतूक व्यवस्था नियोजनबद्ध असावी यासाठी महापालिकेतर्फे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ‘डिजिटल मॅपिंग प्रकल्प’ आकारास येत आहे. या प्रकल्पामुळे परदेशातील वाहतूक व्यवस्थांच्या  धर्तीवर वाहतुकीचे नियोजन करणारे ठाणे देशातील पहिले शहर ठरू शकणार आहे, असा दावा महापौर संजय मोरे यांनी या वेळी केला. शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महापालिकेने हे आश्वासक पाऊल उचलले असून या प्रकल्पाचा अहवाल मंगळवारी कंपनीचे सीईओ शंतनू शर्मा यांनी महापौर संजय मोरे यांच्याकडे सुपूर्द केला.

शहरांतर्गत वाहतूक व्यवस्थेचे नियमन करण्याचा पायाभूत अहवाल तयार झाला असून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना या प्रकल्पातून सुचवण्यात आल्या आहेत.

प्रकल्पामुळे वाहतूक कोंडीची सुटका

‘डिजिटल मॅपिंग प्रकल्पा’ मार्फत ठाणे शहरातील वाहतुकीचे नियोजन करण्यात येणार आहे. पुढील काही वर्षांमध्ये या प्रकल्पामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालणे सुखकर होणार असून शहरातील वाहतूक कोंडीचीही सुटका होणार आहे. ठाणे शहरात ही प्रणाली कार्यान्वित झाल्यानंतर येथे जागतिक दर्जाच्या वाहतूक सुविधा नागरिकांना उपलब्ध होऊ शकणार आहे, असे महापौर संजय मोरे यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2016 2:32 am

Web Title: digital transport in thane
Next Stories
1 प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांचा वेदनामय प्रवास
2 वांगणी, बदलापुरच्या रेल्वे प्रवाशांत ‘लोकलयुद्ध’
3 आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने भातशेती
Just Now!
X