दुभत्या जनावरांना लसी टोचण्याचे प्रकार वाढीस; लहान मुलांच्या वाढीवर विपरित परिणाम

अधिक दूध मिळविण्याच्या लालसेतून दुभत्या जनावरांना ऑक्सिटॉसिनच्या लसी देण्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगर शहरात समोर आल्यानंतर असे प्रकार आणखी काही डेअरी आणि दूध व्यवसाय करणाऱ्या आस्थापनांकडे सुरू असल्याचा संशय बळावला आहे. मात्र अन्न आणि औषध प्रशासनाचे कमी असलेले मनुष्यबळ आणि हे दूध ओळखण्यात सर्वसामान्यांना येणारे अपयश यामुळे हा छुपा धंदा सुरूच आहे. अशा प्रकारे मिळवलेल्या दुधात ‘ऑक्सिटॉसिन’चे अंश उतरत असल्याने हे दूध प्राशन करणाऱ्या मुलांना बाल्यावस्थेत मिशा फुटणे, मुलींच्या शरीराची जलद वाढ होणे अशा विपरीत परिणामांना तोंड द्यावे लागत आहे.

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
mumbai, KEM Hospital, Artificial Insemination Center, Project Stalled, Election Code of Conduct, child, Infertility, husband wife, couple for Artificial Insemination, mumbai KEM Hospital,
मुंबई : ‘केईएम’च्या कृत्रिम गर्भधारणा केंद्राला आचारसंहितेचा फटका
stock market, 3 7 crore dmat accounts
सरलेल्या आर्थिक वर्षात ३.७ कोटी डिमॅट खात्यांची भर

ऑक्सिटॉसिन लसीचा वापर प्रसूती काळात महिलांना देण्यासाठी होत असतो. मात्र दुभत्या जनावरांना ही लस टोचल्याने या जनावरांमध्ये दुधात पान्हा चोरण्याची क्षमता संपते. त्यामुळे अवयवांवर नियंत्रण न राहता अधिक दूध मिळते. लस टोचल्याने पान्हवलेले दूध काढण्यात दूध व्यापारी यशस्वी ठरतो. मात्र हे दूध नैसर्गिक नसते. त्यात ऑक्सिटॉसिनचा अंश असतो. या पान्हवलेल्या दुधामुळे लहान मुलांच्या शरीरातील गुणसूत्रांत बदल होण्याची शक्यता असते. त्यामुळे लहान मुले त्यांच्या वयापेक्षा मोठी दिसतात. त्यांना अकाली मिशा फुटतात, मुलींच्या शरीराची जलद वाढ होणे असे विपरीत बदल त्यांच्यात घडतात. त्यामुळे ‘ऑक्सिटॉसिन’युक्त दूध आरोग्यास हानीकारक असल्याचा निर्वाळा तज्ज्ञ डॉक्टर तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.

नुकतेच उल्हासनगरात एका डेअरीवर या लसींचा साठा आणि वापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र गेल्या काही वर्षांत वाढलेली लोकसंख्या आणि त्या तुलनेत वाढलेल्या दुधाच्या मागणीवरून उत्पादकांची वाढलेली संख्या पाहता या सर्वाकडे लक्ष देण्याइतके सामर्थ्य आताच्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडे नसल्याचे समोर आले आहे. त्यात बेकायदा पद्धतीने होणारी ऑक्सिटॉसिनची विक्री आणि त्याचासाठा रोखण्यातही या विभागाला अपयश आले आहे.

रासायनिक संप्रेरकांच्या वाढत्या वापरावर चिंता

अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी तयार केलेल्या रासायनिक संप्रेरकांच्या मदतीने उत्पादन वाढते. मात्र अशा पदार्थाच्या सेवनातून आरोग्याच्या समस्या भेडसावतात. फळे आणि भाज्या पिकवण्यासाठी त्यांचा वापर होऊ लागल्याने यावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासनाने पावले उचलली आहेत. अशाच प्रकारे दूधाचे उत्पादन वाढवण्यासाठी आता ऑक्सिटॉसिन वापरले जात असल्याचे समोर आले आहे. ऑक्सिटॉसिनच्या  लसीचा वापरही गेल्या काही वर्षांत वाढल्याने वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

परराज्यांतून पुरवठा

दूध वाढवण्यासाठी बेकायदेशीररीत्या वापर होणाऱ्या ऑक्सिटॉसिनचा खरा वापर महिलांच्या प्रसूतीवेळी होत असतो. मात्र महाराष्ट्रात ही लस बनविणारी कोणतीही कंपनी नसल्याचे समोर आले आहे. परराज्यांतून तयार होणारे ऑक्सिटॉसिन बेकायदा पद्धतीने राज्यात येत आहे. उत्तर प्रदेशातील गया आणि पश्चिम बंगालमधून मोठय़ा प्रमाणावर या लसीचा पुरवठा बेकायदेशीरपणे छुप्या पद्धतीने होत असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यात अवघ्या दहा ते पंधरा रुपयांत कंपनीचे नाव नसलेल्या लसी विकत मिळतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.