News Flash

‘जय श्रीराम’च्या घोषणांची सक्ती करत ठाण्यात टॅक्सी ड्रायव्हरला मारहाण

या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत

संग्रहित प्रतीकात्मक छायाचित्र

ठाण्यातील मुंब्रा भागातल्या एका टॅक्सी ड्रायव्हरने त्याला मारहाण झाल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. फैसल असं या टॅक्सी ड्रायव्हरचं नाव असून तिघांनी आपल्याला मारहाण केली. तसंच त्यानंतर जय श्रीरामच्या घोषणा देण्याची सक्तीही केली असंही फैसलनं म्हटलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

फैसलला मारहाण करणाऱ्या तिघांचा पोलीस शोध घेत आहेत. काही दिवसांपूर्वीच झारखंडमधल्या रांचीमध्ये तरबेज अन्सारी या तरूणाला चोरीच्या संशयावरून मारहाण करण्यात आली होती. सात तास त्याला मारहाण करण्यात आली. ज्यानंतर या तरूणाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मारहाणीमुळे त्या तरूणाला त्रास होऊ लागला. ज्यानंतर पोलिसांनी त्याला रूग्णालयात दाखल केलं. मागच्या शनिवारी त्याचा मृत्यू झाला.

हे सगळे प्रकरण ताजे असतानाच ठाण्यातल्या मुंब्रा भागात असलेल्या टॅक्सी चालकाला तिघांनी मारहाण केल्याचा आणि त्याला जय श्रीरामच्या घोषणा द्यायला लावल्याचा प्रकार घडला आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे. फैसलने त्याला मारहाण करणाऱ्यांविरोधात पोलिसात धाव घेतली आहे. इतकेच नाही तर आपल्याला मारहाण केल्यानंतर जय श्रीराम चे नारे द्यायला लावले असाही आरोप फैसलने केला आहे. याप्रकरणी आता पोलीस पुढील तपास करत आहेत

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2019 9:24 am

Web Title: fir registered after faisal a taxi driver in mumbra had filed a complaint on june 23 alleging he was beaten by three people he was also forced to say jai shri ram by the attackers scj 81
Next Stories
1 युवकाला ‘जय श्रीराम’ची सक्ती; तिघांना अटक
2 पावसाळय़ातही मेट्रोची कामे
3 आमदाराची बॅग पळविणाऱ्या रेल्वेतील चोरटय़ाला अटक
Just Now!
X