वसईच्या उपनिबंधक कार्यालयाला बुधवारी मध्यरात्री आग लागली. या आगीत महत्वाची हजारो कागदपत्रे आणि फर्निचर जळून खाक झाले. शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याची अंदाज वर्तविण्यात येत आहे.

वसई पश्चिेमेला तामतलाव येथे हे सरकोरी उपनिबंधक कार्यालय आहे. बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली. जॉनी क्रॉस लेन मध्ये असलेल्या या कार्यालयाभोवती अनेक बंगले आहेत. या बंगल्यामधील नागरिकांनी आग लागल्याची माहिती कार्यालयात काम करणाऱ्या मदतनीसाला दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन तासाभराच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. परंतु तो पर्यंत महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाली होती. आगीत नेमकी किती आणि कोणती कागदपत्रे जळाली त्याचा पंचनामा करून तपास करण्यात येत आहे. आगीचे नेमके कारण क़ळू शकले नाही.