13 July 2020

News Flash

मुलीवरील अत्याचारप्रकरणी मित्रासह पाच जणांना अटक

पाचही जणांना खडकपाडा पोलिसांनी सोमवारी रात्री ताब्यात घेतले.

कल्याण पश्चिमेत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर रविवारी पाच जणांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यात पीडित मुलीच्या मित्रासह त्याच्या चार साथीदारांचा समावेश असून, या पाचही जणांना खडकपाडा पोलिसांनी सोमवारी रात्री ताब्यात घेतले.

समीप पाटील (१९), नीलेश काळे (२५), प्रथमेश भोईर (२१), विनायक पाटील (२०) व मयूरेश पाटील (२५) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पीडित मुलगी कामावर गेलेल्या आईची वाट पाहत रविवारी सायंकाळी घरी बसली होती. तिला घराबाहेर बोलावण्यात आले. त्यांच्यासोबत जाण्यास नकार देताच तिचे हात बांधून  तिला निर्जनस्थळी नेऊन अत्याचार करण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2016 12:10 am

Web Title: five arrested for assaulting a girl
टॅग Dombivali
Next Stories
1 पालघर विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेचे अमित घोडा विजयी, राजेंद्र गावितांचा दारुण पराभव
2 नाटय़संमेलनाची ‘घरघर’ संपली!
3 नाटय़संमेलनात ठाणेकरांची छाप!
Just Now!
X