05 March 2021

News Flash

तोतया तिकीट तपासणीस अटकेत  

दिवा रेल्वे स्थानकात एका तोतया तिकीट तपासणीसाला गुरुवारी दिवा रेल्वे सुरक्षा दलाने अटक केली

संग्रहित छायाचित्र

दिवा रेल्वे स्थानकात एका तोतया तिकीट तपासणीसाला गुरुवारी दिवा रेल्वे सुरक्षा दलाने अटक केली. सलीम हुसेन शेख (३५) असे या आरोपीचे नाव असून तो मुंब्य्राचा रहिवासी असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

दिवा रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक एकवर सलीम हा प्रवाशांना तिकिटाबाबत विचारत होता. मात्र, प्रवाशांना सलीमवर संशय आल्याने त्यांनी सलीमकडून ओळखपत्राची मागणी केली. त्यावेळी तो व्यवस्थित उत्तरे देत नव्हता. यादरम्यान त्याने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्य़ाची कबुली दिली. याप्रकरणी सलीमविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पथकाने त्याला अटक केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2019 4:37 am

Web Title: impersonation ticket inspection akp 94
Next Stories
1 कळवा रुग्णालयाच्या अधिष्ठातांचे पद धोक्यात
2 कोटींचा खर्च तरीही टँकरचा फेरा
3 दोन हजार  दावे प्रलंबित
Just Now!
X