विरार : विरारच्या जीवदानी मंदिरात देवीच्या दर्शनासाठी आता भाविकांना हेलिकॉप्टरने सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. त्याचे प्रात्यक्षिक नुकतेच पार पडले. पुण्याच्या एका खासगी कंपनीकडून ही सेवा राबविली जाणार असून त्यासाठी हेलिपॅड जीवदानी मंदिराच्या मैदानात तयार करण्यात आले आहे. महिनाभराच्या आताच ही सेवा भाविकांसाठी सुरू केली जाणार आहे.

विरारचे जीवदानी मंदिर हे विरारमधील सुप्रसिद्ध मंदिर असून महाराष्ट्रातून दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. नुकतेच या मंदिरात फनीक्युलर ट्रेनची सुविधा भाविकांसाठी सु्नरू करण्यात आली आहे. त्यानंतर आता हेलिकॉप्टरचीपण सेवा सुरू केली जाणार आहे. पुण्यातील वरद एव्हिएशन या खासगी संस्थेकडून ही सेवा पुरविली जाणार आहे.  शनिवार आणि रविवार ही सेवा सुरूअसेल.  यात एका वेळी पाच भाविकांना गडावर घेऊन जाता येणार आहे. त्याची दर साधारणपणे ३५०० ते ५००० रुपयाच्या दरम्यान असतील अशी माहिती जीवदानी मंदिराचे संचालक प्रदीप तेंडुलकर यांनी दिली आहे. त्याचबरोबर मंदिराने त्यांना आता एक तात्पुरते हेलिपॅड तयार करून दिले असून भविष्यात हायड्रोलिक हेलिपॅडसुद्धा तयार करून देण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला आहे. तसेच येणाऱ्या काळात ही सेवा कशी अधिक स्वस्त केली जाईल याबाबत विचार केला जात आहे.

nashik, Adulterated Goods, Worth Rs 54 thousand, Adulterated Goods Seized, Adulterated prasad, Trimbakeshwar Adulterated prasad, nashik news,
त्र्यंबकेश्वरमध्ये ५४ हजार रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त
solapur, Extortion Case, Traders Forced to Pay, Ambedkar Jayanti Celebration, Traders Forced to Pay Ambedkar Jayanti, dr baba saheb ambedkar jayanti, police case,
सोलापूर : जयंती उत्सवाच्या वर्गणीच्या नावाने खंडणी मागितल्याने दोघांवर गुन्हा
श्श्श्श… वाघोंबांची तलावामध्ये सुरू आहे पूल पार्टी; ‘ठंडा ठंडा कुल कुल’मुळे बाहेर निघायलाच तयार नाही
jejuri marathi news, two lakh pilgrims jejuri marathi news
जेजुरीच्या सोमवती यात्रेस दोन लाख भाविक, शालेय परीक्षा व पाडवा सणाचा यात्रेवर परिणाम