विषय समित्यांमध्येही भाजप-टीम ओमीत तडजोड 

मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही अद्याप कलानी गटाला महापौरपद मिळत नसल्याने कलानी गट आक्रमक झाला होता. नुकत्याच झालेल्या विविध विषय समित्यांच्या निवडणुकीत कलानी गट आयलानी गटाला जेरीस आणण्याची शक्यता होती. मात्र पुन्हा कलानी गटाला महापौरपदाचे आश्वासन देऊन मध्यस्थीचा यशस्वी प्रयत्न ‘भाजप’च्या वरिष्ठांनी केला आहे. त्यामुळे कलानींच्या महापौरपदाचा तिढा अखेर सुटला असून विद्यमान महापौर लवकरच राजीनामा देणार आहेत.

thane lok sabha marathi news, thane bjp sanjay kelkar marathi news
ठाण्यात भाजपच्या जुन्या-नव्यांमध्ये रस्सीखेच
BJP needs support from MNS A look at Raj Thackeray stance on participation in the Grand Alliance
भाजपला मनसेची साथ हवी ; महायुतीतील सहभागाबद्दल राज यांच्या भूमिकेकडे लक्ष
bjp claim thane loksabha marathi news, thane lok sabha bjp marathi news
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यावर भाजपचा दावा का? भाजपच्या विस्तारवादाने शिंदेसेना भयग्रस्त?
sanjay raut narendra modi
“रोज नवे जोक, देशात जॉनी लीवरनंतर…”, मेरठच्या सभेतील मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊतांचा टोला

उल्हासनगर महापालिकेच्या नऊ  विशेष समिती सभापतींच्या निवडणुकीत ‘भाजप’ आणि टीम ओमी कलानी यांच्यातील वादाचे पडसाद उमटण्याची शक्यता होती. दीड महिन्यापूर्वी भाजपच्याच सभागृह नेत्यांनी ओमी कलानी यांच्या पत्नी पंचम कलानी यांना महापौरपद देण्यासाठी वरिष्ठ नेते सकारात्मक असल्याची घोषणा केली होती. तसेच जुलै महिन्याच्या अखेपर्यंत नवा महापौर शहराला मिळेल असेही त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र त्यानंतरही विद्यमान महापौर मीना आयलानी पदावर कायम आहेत.

आम्हाला राजीनामा देण्याचा निरोप नाही, असा दावा कुमार आयलानी यांच्याकडून करण्यात येत होता. त्यामुळे ओमी कलानी यांची कोंडी झाल्याचे चित्र होते. विषय समित्यांच्या सभापती पदाच्या निवडीत चमू ओमी कलानी आपली ताकद दाखवत मूळ भाजपच्या उमेदवारांना धक्का देण्याची शक्यता होती. त्यामुळे भाजप आणि साई अशा दोन्ही पक्षांनी पक्षादेश (व्हिप) जारी केला होता. महापौरपदावरून भाजप- चमू ओमी यांच्यात सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षांचा परिणाम होऊन नाचक्की टाळण्यासाठी मध्यस्थीचे प्रयत्न सुरू झाले. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ओमी कलानी यांच्यामध्ये राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी यशस्वी मध्यस्थी करीत महापौर मीना आयलानी यांना राजीनामा देण्याचे आदेश दिल्याची माहिती मिळाली आहे. येत्या दोन दिवसांत विद्यमान महापौर मीना आयलानी राजीनामा देतील, असे ‘भाजप’ जिल्हाध्यक्षांकडून सांगण्यात आले.

कलानींचा वरचष्मा

पंचम कलानी महापौरपदी विराजमान झाल्यानंतर एका दीड दशकानंतर उल्हासनगर शहराची सुत्रे पुन्हा कलानी कुटुंबाकडे जाणार आहेत. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उल्हासनगर मतदारसंघात ज्योती कलानी आमदार आहेत. आता शहराच्या महापौर पंचम कलानी झाल्यास शहरात कलानी कुटुंबाचा वरचष्मा राहणार आहे.