चार नव्या मिनी बसची प्रवाशांना सुविधा

वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत अपुऱ्या असलेल्या वाहतूक सुविधेमुळे त्रासाला सामोरे जाणाऱ्या डोंबिवली पश्चिमेकडील नागरिकांकडे अखेर महापालिका व परिवहन उपक्रमाचे लक्ष गेले आहे. कल्याण-डोंबिवली परिवहन उपक्रमाने (केडीएमटी) डोंबिवली पश्चिमेकडे चार नवीन मिनी बसची वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पश्चिमेकडील वेगवेगळय़ा भागांतून रेल्वेस्थानकापर्यंत ये-जा करण्यासाठी प्रवाशांना सुविधा मिळणार आहे.

at least 24 dead in highway collapse in china
चीन महामार्ग दुर्घटनेत २४ जणांचा मृत्यू
traffic, old Mumbai-Pune road ,
तीन वर्षांनंतर जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील दुहेरी वाहतूक पूर्ववत
22 high tide days during monsoon
यंदा समुद्राला पावसाळ्यात २२ दिवस मोठी भरती…२०,२१ सप्टेबरला जुलैला सर्वात मोठी उधाणे, सुमारे पाच मीटर उंचीच्या लाटा उसळणार
power supply of Kalyan East was suddenly interrupted in early morning
उकाड्याच्या होरपळीत कल्याणमध्ये विजेचा लपंडाव, उकाड्याने नागरिक हैराण

गेल्या काही महिन्यांपासून विविध विकासकामांच्या माध्यमातून डोंबिवली पश्चिम भागाचा विकास साधण्याचे काम महापालिका प्रशासनाकडून हाती घेण्यात आले आहे. त्यादृष्टीने नागरिकांना दळणवळणाचीही सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी रेल्वे स्टेशन परिसरात बस आगार उभारण्याचा निर्णय केडीएमटीने घेतला आहे. या आगारातून वाशी येथेही बस सोडण्यात येणार आहे. यापुढे रिंगरुट सेवेद्वारे डोंबिवली पश्चिमेतील विविध भागात या बसेसच्या फेऱ्या होणार असून येत्या सोमवारपासून ही सुविधा प्रवाशांच्या सोयीसाठी उपलब्ध असेल, अशी माहिती परिवहन सभापती भाऊ चौधरी यांनी दिली.

पश्चिमेतील स्टेशन परिसरातील अनाधिकृत दुकाने पालिकेने काही महिन्यांपूर्वी तोडली होती. त्यानंतर रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण केले आणि आता परिवहनच्या माध्यमातून पश्चिमेतील नागरिकांसाठी बस आगार येथे सुरू करण्यात येत आहे. रेल्वे स्थानकाचा एव्हरेस्ट हॉल येथे उतरण्यात येणाऱ्या पुलाजवळील संरक्षक भिंत काल पाडण्यात आली. त्यामुळे मधल्या पुलावरून थेट बाहेर पडण्याचा मार्ग नागरिकांसाठी खुला झाला. स्टेशनमधून बाहेर पडताच नागरिकांना बस सुविधा मिळावी यासाठी येथे बस थांबविण्यात येणार आहे. रिंगरुट पद्धतीने सुरुवातीला ४ मिनी बसेस सोमवारपासून रस्त्यावर उतरणार आहेत. या बसेसच्या माध्यमातून कोपरगाव, गरिबाचा वाडा आदी भागात नागरिकांना केडीएमटी बसने जाता येणार आहे. बस फेऱ्यांचा वेळेचा अंदाज व प्रवाशांची संख्या लक्षात आल्यानंतर बसेसच्या फेऱ्यांचे वेळापत्रक निश्चित करण्यात येईल, असे चौधरी यांनी सांगितले.