07 July 2020

News Flash

तरुणीवर लैंगिक अत्याचार

दोघा अल्पवयीन मुलांना नारपोली पोलिसांनी ताब्यात घेतले असून उर्वरित दोघांना अटक केली आहे. 

(सांकेतिक छायाचित्र)

ठाणे : भिवंडी येथील कामतघर भागात २५ वर्षीय विवाहितेवर चार जणांनी लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला. या चौघांपैकी दोघे अल्पवयीन आहेत. तर, एकजण तिचा दीर आहे. दोघा अल्पवयीन मुलांना नारपोली पोलिसांनी ताब्यात घेतले असून उर्वरित दोघांना अटक केली आहे.

कामतघर येथील पीडितेला बुधवारी तिच्या २२ वर्षीय दिराने परिसरातील एका जंगलात बोलाविले.  ती महिला त्याठिकाणी गेली असता, तिच्यावर दिराने लैंगिक अत्याचार केले. त्याचवेळी बोटूराम लबडे (२७) दोन अल्पवयीन मुलांसोबत तेथून जात होता. या तिघांनी दिराला पकडून ठेवले. त्यानंतर बोटूराम आणि त्याच्यासोबत असलेल्या १७ वर्षीय मुलानेही तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून महिलेचा दीर, बोटूराम व दोन अल्पवयीन मुलांवर नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी महिलेचा दीर आणि बोटूरामला अटक केली आहे. तर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 14, 2019 5:20 am

Web Title: married woman sexual assault in bhiwandi thane zws 70
Next Stories
1 डेंग्यूमुळे दोन महिलांचा मृत्यू
2 रूळ बदलताना  गाडी ‘भरकटली’
3 खारेगाव रेल्वे फाटकाच्या जागी वर्षभरात पूल
Just Now!
X