कल्याण-नगर महामार्गावरील पिंपरी पेंढार येथे अज्ञात वाहनाने बिबट्याला धडक दिली. त्यात बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. गेल्या अनेक दिवसांपासून जुन्नर तालुक्यात बिबट्यांचा वावर मोठ्याप्रमाणात वाढला होता. भक्षाच्या शोधासाठी ते रस्त्यावर फिरत असत. यापैकी एका बिबट्याला गुरूवारी रात्री वाहनाने धडक दिली.
गावकर्‍यांनी लगेचच या घटनेची माहिती वनअधिकार्‍यांना दिली. त्यानंतर वनाधिकार्‍यांनी घटनास्थळी जाऊन बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला.

भक्षाच्या  शोधात बिबट्या या ठिकणी आला असावा, असा अंदाज वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. बिबट्याला धडक दिलेल्या वाहनाबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही.