28 September 2020

News Flash

बदलापूर : सात वर्षीय मुलीची हत्या करुन आईने संपवलं जीवन

शिरगाव परिसरातली घटना, गुन्हा दाखल

प्रतिकात्मक छायाचित्र

बदलापुरात राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेने आपल्याच मुलीची हत्या करुन स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बदलापूर पूर्वेकडील शिरगाव भागातील शुभंकरोती कॉम्पेक्समध्ये हा प्रकार घडला आहे. मुंबई पोलीस दलात काम करणारे अशोक पाटील हे आपली आई, पत्नी आणि मुलीसह या भागात राहतात. बुधवारी रात्री पाटील ड्युटीवर गेले असताना…रात्री सासु झोपल्यानंतर मिना पाटील यांनी धारदार सुरीने स्वतःच्या मुलीवर वार करुन तिची हत्या केली. यानंतर मिना यांनी स्वतःवरही वार करुन घेत आत्हत्या केली.

बेडरुममध्ये झोपलेल्या अशोक पाटील यांच्या आईला आवाज आला असल्या त्या बाहेर आल्यानंतर त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह दिसले. अशोक पाटील यांच्या आईने केलेल्या फिर्यादीवरुन बदलापूर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आईने आपल्याच मुलीची हत्या का केली असेल या मागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही, सहायक पोलीस निरीक्षक एच.एम.कुलकर्णी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2020 5:22 pm

Web Title: mother kill her own daughter and later done suicide in badlapur psd 91
Next Stories
1 प्रवासासाठी रांगा कायम
2 टीएमटीची धाव वेशीपर्यंतच
3 मजुरांच्या टंचाईमुळे पेरण्यांचा खोळंबा
Just Now!
X