मिरा रोड येथे इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या नऊ वर्षांच्या मुलीला  खासगी शिकवणी वर्गातील शिक्षिकेकडून ४५० उठाबशा काढायला लावल्याची शिक्षा सुनावण्यात आली. महिनाभरापूर्वी पाल्याला मारण्याची शिक्षा करू नका, अशी विनंती पालकांनी केली होती. तरीही शिक्षिकेने शिक्षा दिल्याने विद्यार्थिनीच्या पालकांकडून  नयानगर पोलिसात शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल  करण्यात  आला.

मिरारोड येथील  शांतीनगर परिसरात खासगी शिकवणी वर्गात हा प्रकार घडला. गेल्या महिन्यात लताने पीडित मुलीस गृहपाठ पूर्ण न केल्यावरून छडीने मारहाण केली होती.  त्यावेळी मुलीच्या आईने त्यांना शिक्षा न करण्यास सांगितले होते. मात्र, १७ जानेवारी रोजी मुलगी शिकवणीवरुन घरी परतली असता, तिने पाय दुखत असल्याचे आईला  सांगितले. तिला चालताना त्रास होत होता. चौकशी केली असता, लताने तिला अभ्यास केला नाही, म्हणून ४५० उठाबशांची शिक्षा केल्याचे समजले.

या शिक्षेमुळे विद्यार्थिनीला रात्रभर त्रास झाला. त्यामुळे पालकांनी उपचारांसाठी मुलीवर रुग्णालयात दाखल केले. दरम्यान शिक्षिकेविरुद्ध  गुन्हा दाखल केल्याची माहिती देताना नयानगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सोहेल पठाण यांनी दिली.