९ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधींनी ब्रिटिशांना ‘चले जाओ’ असे सांगितले. आज या गोष्टीला ४५ वर्षे पूर्ण झाली आहेत. ही आठवण ताजी राहावी यासाठी आज ठाण्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने ‘रन फॉर चले जाओ’ या संकल्पनेतून ‘क्रांती दौड’चे आयोजन करण्यात आले होते. ८ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या उपक्रमाला लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांचा उत्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान, या ‘क्रांती दौड’चे आकर्षण ठरले राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विजेते पॅरालंपिकपटू देवेंद्र जंजारिया.

४५ वर्षांपूर्वी याच दिवशी महात्मा गांधीनी ब्रिटिशांना ‘चले जाओ’ म्हटले होते. त्याचीच आठवण म्हणून या ‘क्रांती दौड’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारताचे सुवर्णपदक विजेते आणि राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारविजेते  पॅरालंपिकपटू देवेंद्र जंजारिया हे मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित होते. या दौडमध्ये ४ ते ५ हजार धावपटूंनी सहभाग घेतला होता. ठाण्यातील मानपाडा परिसरातील खेवडा सर्कल पासून या दौडला सुरुवात झाली आणि काशिनाथ घाणेकर नाट्यमंदिर पासून ते मानपाडा हिरानंदानी मार्गे पुन्हा खेवरा सर्कल येथे संपली. यावेळी विविध वयोगटातील धावपटूसाठी १२ वर्षाखाली ३ किमी, १५ वर्षाखाली ४ किमी, १८ वर्षाखाली 6.५ किमी, आणि १८ वर्षांपासून पुढे १० किमी अशा विविध वयोगटासाठी विविध अंतरासाठी ही दौड ठेवण्यात आली होती.

यावेळी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकच्या विजेत्यांना जंजारिया यांच्या हस्ते पारितोषिक देवून सन्मान करण्यात आला.