कल्याण पश्चिमेतील नवीन कल्याण शहराच्या परिघावर नवनवीन टोलेजंग, देखणी गृहसंकुले उभी राहिली आहेत. अशाच गृहसंकुलांमधील एक सोसायटी म्हणजे साई ब्रिंदावन सोसायटी. कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकापासून रिक्षाने दहा मिनिटांच्या अंतरावर ही सोसायटी आहे. महत्त्वाची खूण म्हणजे पालिकेच्या ‘ब’ प्रभाग कार्यालयाच्या उंबरठय़ाला खेटून हे गृहसंकुल आहे. संकुलाच्या आवारात बारा माळ्यांची एक व आठ माळ्यांच्या दोन इमारती आहेत. एकूण १११ सदस्य या सोसायटीमध्ये राहत आहेत.

साडेआठ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या कल्याणमधील साई ब्रिंदावन या सोसायटीत राहण्यास आलेल्या रहिवाशांचे स्नेहबंध एकमेकांत इतके रुजले आहेत, की ते एक मोठे कुटुंबच आहे. या एकोप्याने सोसायटीला आनंदी व हसतेखेळते गोकुळ असे रूप आणले आहे. उद्योजक, व्यावसायिक, विकासक, डॉक्टर, सरकारी उच्चपदस्थ, कॉर्पोरेट, खासगी आस्थापनांमधील उच्चपदस्थ, अशा विविध क्षेत्रांत कार्यरत असलेला अधिकारी वर्ग सोसायटीत राहत आहेत. सोसायटीच्या बाहेर प्रत्येक जण अधिकारी, पण सोसायटीच्या आत आल्यावर प्रत्येक जण सोसायटीचा सामान्य सदस्य असे वातावरण आहे. वास्तविक टोलेजंग इमारतींमध्ये कॉपरेरेट, हायफाय वातावरण असते. एकदा तळमजल्याच्या उद्वाहनात (लिफ्ट) चढले की, पहिल्या माळ्यापासून ते अकराव्या माळ्यापर्यंत कोण, कुठे राहते याची माहिती अनेक रहिवाशांना नसते, कारण कधी एकमेकांत मिसळण्याचा प्रकार नसतो. कामावर जाताना सोसायटीच्या प्रवेशद्वारात एकमेकांची तोंडओळख आणि चेहऱ्यावर आणलेले उसने हासू, एवढीच काय ती ओळख. या सगळ्या सीमारेषा साई ब्रिंदावन सोसायटीतील रहिवाशांनी तोडून टाकल्या आहेत. विविध जाती, धर्म, प्रांतांमधील कुटुंबे सोसायटीत राहत आहेत.  येथे अगदीच खेळीमेळीचे वातावरण आहे. सोसायटीतून बाहेर पडताना कोणी पायी जात असेल, कोणी आपल्या खासगी वाहनाने बाहेर पडत असेल तर अशा वेळी काही सेकंद का होईना, हातवारे करून एकमेकांची ख्यालीखुशाली विचारून पुढचे पाऊल येथील रहिवासी टाकतात. एकमेकांविषयी जिव्हाळा किती? तर एका कुटुंबात एक आजी खूप अत्यवस्थ होत्या. त्याचबरोबर या कुटुंबाला आपल्या सख्ख्या नातेवाईकाच्या समारंभाला मुंबईत जायचे होते. अशा द्विधा मन:स्थितीत असलेल्या या कुटुंबाला सोसायटीतील एका डॉक्टर कुटुंबाने ‘तुम्ही निश्चिंतपणे तुमच्या समारंभाला जाऊन या आणि आम्ही तुमच्या घरात आजींजवळ थांबतो,’ असे सांगितले. कुटुंब कार्यक्रमस्थळी पोहोचले आणि आजीने देवाच्या घरी प्रयाण केले. मग हे कुटुंब येईपर्यंतचे सगळे सोपस्कार या डॉक्टर दाम्पत्याबरोबर अख्ख्या सोसायटीने पार पाडले. हे झाले एक वानगीदाखल उदाहरण. अशी प्रत्येकाच्या सुखदु:खात सोसायटीतील रहिवासी प्रसंगी सहभागी होतात. या सोसायटीत मनोहर निकम हे सेवानिवृत्त रहिवासी आहेत. निवृत्तीचे समाधानी जीवन जगत असताना, जन्मजात समाजसेवेची आवड निकमकाकांना असल्याने सोसायटीचे लोकसेवक (समाजसेवक) म्हणूनही ते महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

municipality keeping eye after removing the encroachment on Belpada hill
पनवेल : बेलपाडा टेकडीवरील अतिक्रमण हटविल्यानंतर पालिकेची नजर
Navi Mumbai, Escalating Traffic, traffic jam, airoli, belapur, Illegal Parking, traffic jam in Navi Mumbai, traffic jam belapur, traffic jam airoli, illegal parking in navi mumbai, marath news, two wheelar parking, four wheelar parking, navi mumbai citizens,
बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीचा खोळंबा, वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे ऐरोलीपासून बेलापूरपर्यंत वाहनतळांची सुविधा अपुरी
Unauthorized constructions in Vasai Virar city
पालिका गुंतली निवडणुकीच्या कामात, भूमाफिया जोमात
adani realty msrdc latest marahti news
वांद्रे रेक्लेमेशन पुनर्विकासाचे कंत्राट अदानी समूहाला, ‘एमएसआरडीसी’च्या मुख्यालयाच्या ठिकाणी लवकरच उत्तुंग इमारत

पारदर्शी कारभार

सोसायटीचा कारभार योगेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे. त्यांना जयराम पाटील (उपाध्यक्ष), मनोहर निकम (सचिव), अजित विशे (खजिनदार), रवींद्र कुलकर्णी यांच्यासह अन्य सर्व सदस्यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे. सोसायटीची देखभाल दुरुस्ती रक्कम, पाणी, मालमत्ता कर व अन्य सर्व व्यवहार धनादेशाने पूर्ण केले जातात. प्रत्येक व्यवहाराची पावती आणि नोंद तात्काळ जमाखर्च पुस्तिकेत केली जाते. देशमुख स्वत: विकासक, विशे हे विक्रीकर विभागात उच्चपदस्थ अधिकारी, कुलकर्णीही ‘आरटीओ’ कार्यालयात वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. अशा वेगवेगळ्या क्षेत्रांतील पारंगत मंडळी सोसायटीच्या कार्यकारी मंडळावर सक्रिय असल्याने कधी एक पैसा इकडेतिकडे होत नाही. अतिशय पारदर्शकपणे सोसायटीचा कारभार करण्यात येतो. १११ सदस्य विश्वस्त मंडळावर इतका विश्वास ठेवून आहेत की, नवीन आर्थिक वर्षांत कोणतीही निवडणूक न घेता आहे त्याच विश्वस्त समितीवर विश्वास टाकून त्यांना सोसायटीचा गाडा पुढे चालविण्यास सर्व सदस्यांकडून अनुमती दिली जाते. सोसायटीची कधी निवडणूक घेऊन सदस्यनिवडीचा प्रसंग आला नाही. नवीन सोसायटी कायद्याप्रमाणे आता फक्त निवडणुकीचा उपचार पार पाडला जातो. सदस्य तेच. इतका सोसायटी सदस्यांना विश्वस्त समिती आणि रहिवासी म्हणून एकमेकांवर विश्वास आहे.

मैदान, वाहनतळ आणि बगिचा

सोसायटी प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यानंतर टोलेजंग इमारती पाहून आपण आता उंच गडावर चढणार आहोत, असा काही क्षण भास होतो. इतकी भव्यता या इमारतींमध्ये आहे. दोन काटकोनांत उभ्या असलेल्या इमारतींच्या मध्ये प्रशस्त मोकळे मैदान आहे. इमारतीच्या चोहोबाजूंनी प्रशस्त वाहनतळ आहे. चौफेर बाजूंनी विविध प्रकारची झाडे आणि हिरवाई आहे. एक टुमदार हिरवागार बगिचा सोसायटीच्या आवारात आहे. ऐसपैस, मोकळ्या वातावरणामुळे रहिवाशांना सकाळ, संध्याकाळ शतपावली करण्यासाठी बाहेर जाण्याची गरज भासत नाही. आजी-आजोबांना बसण्यासाठी बाहेर कट्टे आहेत. सकाळ, संध्याकाळच्या वेळेत ही मंडळी आपला निवांत वेळ या ठिकाणी घालवत असतात. सोसायटीला पालिकेच्या पाण्यावर अवलंबून राहण्यास लागू नये म्हणून सोसायटीने स्वत:ची कूपनलिका खोदून घेतली आहे. पावसाळ्यात दरवर्षी सदस्यांकडून वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला जातो. या वेळी दहा आंब्यांची कलमे लावण्यात आली आहेत. सुरक्षेसाठी पाच सुरक्षारक्षक तैनात असतात. सीसीटीव्ही कॅमेरे आवारात आहेत. या कॅमेऱ्याने टिपलेल्या हालचालींमुळे एका चोराचा ससेमिरा करणे पोलिसांना शक्य झाले होते. सर्व राष्ट्रीय सण सोसायटीत साजरे केले जातात. या वेळी अख्खी सोसायटी कुटुंबीयांसह या उपक्रमात सहभागी होते. वर्षभरातून संपूर्ण सोसायटी एकदा मैदानावर आणावी म्हणून स्नेहसंमेलन आयोजित केले जाते. हे संमेलन म्हणजे सोसायटीचा महाउत्सव असतो. या उत्सवात सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत सोसायटी बालगोपाळांपासून ते वृद्धांपर्यंत रंगून गेलेली असते. महिलाही तितक्याच आनंदाने, पारंपरिक पेहरावात आत्मीयतेने सहभागी होतात.

अगदी मुख्य रस्त्यालगत, पण एकांतात सोसायटीची जागा असल्याने बाहेरच्या गजबजीचा सोसायटीच्या शांत, निवांत वातावरणावर कोणताही परिणाम होत नाही. दरवर्षी सोसायटीच्या आर्थिक कारभाराला सरकारी लेखापरीक्षकांचा उत्तम शेरा मिळतो. यातच सोसायटीतील सदस्यांना समाधानाची पावती मिळते.

समस्यांचे दुखणे

  • पालिकेच्या ‘ब’ प्रभाग कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस सोसायटी उभी आहे. सोसायटी आत-बाहेर स्वच्छ-टापटीप आणि समोर पालिका कार्यालयाच्या आवारात मात्र झाडांचा पालापाचोळा, सडलेले, टाकाऊ पाइपचे ढीग. बाहेरच्या पदपथावर कचरा, टाकाऊ मलबा पडलेला. हे चित्र बदलण्यासाठी सदस्य प्रयत्नशील असतात, पण त्याला प्रशासनाकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही.
  • सोसायटीच्या समोरील भागात एक सिनेमागृह आहे. या ठिकाणी येणाऱ्या सर्व रसिकांची वाहने सिनेमागृह सोडून साई ब्रिंदावन सोसायटीच्या समोरील रस्त्यावर उभी करून ठेवली जातात. त्यामुळे अनेक वेळा ये-जा करणे मुश्कील होऊन जाते. हे नेहमीचे प्रश्न सोडविण्यासाठी पालिका, वाहतूक विभागाने पुढाकार घ्यावा, अशी सदस्यांची मागणी आहे.
  • येणाऱ्या काळात सोसायटीतील कचरा सोसायटी आवारात नष्ट करण्याचा उपक्रम राबविण्याचा विचार आहे. पावसाचे पाणी जिरविण्यासाठी जलसंचय योजना (रेन वॉटर हार्वेस्टिंग), पाऊस मारा थांबवण्यासाठी छतावर निवारा टाकणे, सौर ऊर्जेच्या वापरातून गरम पाणीपुरवठा, वीज दिव्यांची सोय करण्याचा विचार आहे.