26 October 2020

News Flash

टपाल खात्यातील बचत योजनेत घोटाळा

अनेक टपाल खात्याचे खातेदार गुंतवणूक करत असतात.

भारतीय टपाल खात्याच्या महिला प्रधान क्षेत्रीय बचत योजनेतील महिला प्रतिनिधीने बदलापूरच्या कुळगाव शाखेतून लाखोंचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऑगस्ट २००९ ते डिसेंबर २०१० या काळात एकूण ५५ खात्यांमधून खात्यातील निम्मी रक्कम बनावट स्वाक्षऱ्यांच्या आधारे काढून घेत खातेदारांची आणि शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टपाल खात्याच्या विविध बचत ठेवी मुदत योजना सुरू असतात. त्यात अनेक टपाल खात्याचे खातेदार गुंतवणूक करत असतात. शासनाच्या नव्या योजनांचा लाभ मोठय़ा प्रमाणावर घेतला जात असतानाच यात फसवणुकीचे प्रकारही समोर आले आहेत. असाच फसवणुकीचा एक प्रकार बदलापूर पूर्वेच्या कुळगावच्या टपाल शाखेत समोर आला आहे. ऑगस्ट २००९ ते डिसेंबर २०१० या काळात महिला प्रधान क्षेत्रीय बचत योजनेत गुंतवणूक करणाऱ्या तब्बल ५५ खातेदारांच्या खात्यातून बनावट सहीच्या मदतीने लाखोंची रक्कम काढण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी शीतल देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक देशमुख यांनी दिली आहे. यात टपाल खात्याचे अंबरनाथ उपविभागाचे साहाय्यक अधीक्षक रमेश अवताडे यांनी तक्रार दिली होती. या प्रकरणात योजना प्रतिनिधी म्हणून नेमणूक झालेल्या देशपांडे यांनी ५५ खातेदारांच्या जमा ६ लाख ५० हजार रुपयांच्या रकमेच्या निम्मी काढण्यायोग्य रक्कम बनावट सहीच्या आधारे खात्यांतून काढून ती खातेदारांना न देता अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2019 4:05 am

Web Title: scam in indian post office akp 94
Next Stories
1 पितृपक्षातही भाज्या महागच
2 वेदनादायी खड्डय़ांवरून समाजमाध्यमांत हास्यकारंजी!
3 पावसाचा धिंगाणा सुरूच!
Just Now!
X