४० किलोवॅट विजेची निर्मिती;  शाळेसाठी वापर करून अतिरिक्त विजेची विक्री

पारंपरिक ऊर्जास्रोतांच्या टंचाईमुळे भविष्यातील वीजसंकटावर तोडगा काढण्यासाठी सौर तसेच पवन यांसारख्या अपारंपरिक ऊर्जास्रोतांना प्राधान्य देण्यासाठी जागृती केली जात आहे. मात्र, या कामात सरकारी यंत्रणांनी पुढाकार घ्यावा, असा मतप्रवाह सर्वसामान्यांत रुजलेला असताना डोंबिवलीतील मानपाडा येथील विद्यानिकेतन शाळेने स्वत:च सौर ऊर्जानिर्मितीचा वसा घेतला आहे. शाळेच्या आवारात उभारण्यात आलेल्या प्रकल्पातून ४० किलोवॅट विजेची निर्मिती होणार आहे. यातून शाळेच्या विद्युतपुरवठय़ाची गरज भागवल्यानंतर वीज शिल्लक राहणार असून ती महावितरणला विकण्यात येणार आहे.

trees cut, Metro-3,
मेट्रो-३ प्रकल्पासाठी तोडलेल्या झाडांच्या पुनर्रोपणाचे प्रकरण : कामातील प्रामाणिकपणावर उच्च न्यायालयाच्या विशेष समितीचे बोट
Northwest Mumbai beautification of Jogeshwari Caves is sometimes under construction awaiting rehabilitation
आमचा प्रश्न : वायव्य मुंबई – जोगेश्वरी गुंफेचे सुशोभीकरण कधी प्रकल्पबाधितही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत
Eight housing projects on track due to Central government Swamih fund
राज्यातील रखडलेल्या गृहप्रकल्पांना संजीवनी! केंद्राच्या ‘स्वामीह’ निधीमुळे आठ प्रकल्प मार्गी
pimpri chinchwad, drain cleaning work
पिंपरी: नालेसफाई अद्याप कागदावर!

महावितरणच्या डोंबिवली विभागाच्या सहकार्याने विद्यानिकेतन शाळेने या प्रकल्पाची उभारणी केली आहे. जर्मन कंपनीच्या तंत्रज्ञानाचा वापर करून शाळेच्या आवारातील बैठय़ा इमारतींच्या गच्चीवर १३० सौरऊर्जा संग्राहक (सोलर पॅनेल) बसवण्यात आले आहेत. हे संग्राहक वीजवाहिन्यांच्या माध्यमातून शाळेच्या विद्युत यंत्रणेशी जोडण्यात आले असून ती महावितरणच्या मुख्य वीज वाहिनीला जोडण्यात आली आहे. या दोन्ही वीज यंत्रणेचा मध्यस्थ म्हणून ‘सौर ऊर्जा नियंत्रक’ (सोलर इनव्हर्टर) शाळेत बसविण्यात आला आहे. इनव्हर्टरची वीज वहन व साठवण क्षमता ५० किलोवॅट आहे. महावितरणचे अभियंता रिझवान शेख यांनी या प्रकल्प उभारणीसाठी सर्वतोपरी सहकार्य केले, असे विद्यानिकेतन संस्थेचे संस्थापक विवेक पंडित यांनी सांगितले. शाळेतील वीजगरज पूर्ण झाली की उर्वरित ऊर्जा शाळा व महावितरणच्या एकत्रित ‘ग्रीड’ मधून महावितरणकडे वर्ग होणार आहे, असे ते म्हणाले

भारनियमनावर मात

शाळा ग्रामीण हद्दीत येते. त्यामुळे भारनियमनाचा फटका बसे. शाळेत ऑक्टोबर, मेमध्ये परीक्षा सुरू असल्या; त्यात वीज पुरवठा खंडित झाला की विद्यार्थ्यांसह शिक्षकांची लाहीलाही व्हायची. इनव्हर्टरची सुविधा असली तरी त्याला मर्यादा होती. त्यामुळे शाळेत आपण सौर ऊर्जेचा प्रकल्प राबवावा, असा विचार सात वर्षांपूर्वीच केला होता, असे विवेक पंडित यांनी सांगितले.

महावितरणच्या आवश्यक परवानग्या घेऊन सौर प्रकल्प उभारण्यात आला आहे. महावितरण आणि विद्यानिकेतन यांचे या ऊर्जा वापरात आदानप्रदान होणार आहे. शाळेने किती सौर वीज वापरली आणि त्यामधील किती सौर वीज महावितरणला मिळाली, याचे दरवर्षी मूल्यांकन केले जाईल. विद्युत नियामक आयोगाच्या वीज दराप्रमाणे महावितरणने शाळेकडून घेतलेल्या विजेप्रमाणे त्यांना देयक देण्यात येईल.

– रिझवान शेख, अभियंता, महावितरण